Google Jobs In India: गुगलमध्ये नोकरी पाहिजे? काय आहे शैक्षणिक पात्रता अन् कशी मिळेल संधी? वाचा महत्वाची माहिती

How Search Job In Google: गुगलमध्ये काम करणाऱ्या बहुतेक भारतीयांना परदेशात तसेच बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई, गुरुग्राम आणि चेन्नई येथे पोस्टिंग मिळते. चांगल्या पगारामुळे आणि अतिरिक्त फायद्यांमुळे गुगलमध्ये काम करणे अनेकांचे स्वप्न असते.
Google Jobs In India: गुगलमध्ये नोकरी पाहिजे? काय आहे शैक्षणिक पात्रता अन् कशी मिळेल संधी? वाचा महत्वाची माहिती
How Search Job In Google: Saamtv
Published On

How Get Job In Google: गुगल हे जगातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध सर्च इंजिन आहे. जगभरातील प्रत्येक माहिती गुगलवर एका क्लिकवरुन मिळते. म्हणूनच जगातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त गुगलच देऊ शकतं, असे म्हटले जाते. गुगलचे मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे तर भारतातही गुगल ऑफिसच्या अनेक शाखा आहेत. आता एवढी प्रचंड मोठी कंपनी म्हणजे त्यामधील कर्मचाऱ्यांचा पगारही तसाच असणार. म्हणूनच गुगलमध्ये काम करावे, अशी अनेकांची इच्छा असते. पण गुगलमध्ये नोकरी कशी मिळवायची? त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असते? तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या सविस्तर...

Google Jobs In India: गुगलमध्ये नोकरी पाहिजे? काय आहे शैक्षणिक पात्रता अन् कशी मिळेल संधी? वाचा महत्वाची माहिती
Maharashtra Politics : शरद पवारांचं ठरलं! विधानसभेसाठी १०० जागांची तयारी; पदाधिकाऱ्यांना दिले महत्वाचे आदेश, गणेशोत्सवानंतर...

कशी कराल गुगलमध्ये नोकरी?

७ सप्टेंबर,१९९८ रोजी लॅरी पेज व सर्गेई ब्रिन यांनी गूगलची स्थापना केली. गूगल नावाची अमेरिकन कंपनी गूगल सर्च, ऑर्कुट, यूट्यूब, ॲडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते. गूगल कंपनी विशेषतः इंटरनेटवरील माहिती शोधण्याचे, गोळा करण्याचे आणि जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. गूगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. भारतातही गुगल ऑफिसच्या अनेक शाखा आहेत. गुगलमध्ये काम करणाऱ्या बहुतेक भारतीयांना परदेशात तसेच बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई, गुरुग्राम आणि चेन्नई येथे पोस्टिंग मिळते.

गुगलवर काम करणाऱ्या लोकांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. चांगल्या पगारामुळे आणि अतिरिक्त फायद्यांमुळे गुगलमध्ये काम करणे अनेकांचे स्वप्न असते. तसेच तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांची Google हीच पहिली पसंती आहे. Google मध्ये नोकरीसाठी, तुम्ही google.com किंवा https://www.google.com/about/careers/applications/ वर रिक्त जागा तपासू शकता. येथे तुम्हाला Google मधील नोकऱ्यांशी संबंधित नवीनतम अपडेट्स मिळतील. याशिवाय, तुम्ही लिंक्डइन आणि इतर जॉब सर्चिंग साइटवर गुगल जॉब्स देखील शोधू शकता.

Google Jobs In India: गुगलमध्ये नोकरी पाहिजे? काय आहे शैक्षणिक पात्रता अन् कशी मिळेल संधी? वाचा महत्वाची माहिती
Kolhapur News: बाप रे! लेसर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव,पोलिसाचा डोळा सुजला; कोल्हापूरमधील धक्कादायक प्रकार

गुगलमधील नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता!

गुगलमध्ये नोकरीसाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे. या पात्रता कार्य प्रोफाइलनुसार बदलू शकतात.

१. जर तुम्ही Google मध्ये टेक्निकल नोकरी शोधत असाल तर तुमच्याकडे बी-टेक, MCA सारखी तांत्रिक पदवी असणे आवश्यक मानले जाते.

२. गुगलमधील नॉन-टेक्निकल नोकरीसाठी एमबीएसारख्या मॅनेजमेंट कोर्सची पदवी असणे अनिवार्य आहे.

३. गुगल ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे. कोणत्याही परदेशी कंपनीप्रमाणे येथेही नोकरी मिळवण्यासाठी इंग्रजीवर कडक प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

गुगलमध्ये नोकरी कशी शोधाल?

गुगलमध्ये नोकरी शोधण्यासाठी तुम्ही LinkedIn आणि Google Careers ची मदत घेऊ शकता. येथे तुम्ही Google मधील प्रत्येक रिक्त पदाची माहिती सहज मिळवू शकता.

१. लिंकडीन- ही जॉब सर्च साइट आहे. तुम्ही Google वर रिक्त जागा तपासू शकता. गुगलवर काम करणाऱ्या लोकांशी संपर्क साधण्याचा आणि नोकरीबद्दल थेट बोलण्याचाही पर्याय आहे.

२. गुगल करिअर- तुम्ही गुगलच्या careers.google.com या भर्ती वेबसाइटवर Google मधील रिक्त पदांचे तपशील देखील तपासू शकता.

Google Jobs In India: गुगलमध्ये नोकरी पाहिजे? काय आहे शैक्षणिक पात्रता अन् कशी मिळेल संधी? वाचा महत्वाची माहिती
Dhule Crime : धुळ्यात रात्रीचा थरार.. कुटुंबीयांवर रोखली बंदुक; साडेतीन लाखांहून अधिकचा ऐवज घेऊन चोरटे पसार

गुगलमधील टेक्निकल जॉब:

१. कनिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता (Junior Software Engineer)

२. डेटा वैज्ञानिक (Data Scientist)

३. युएक्स डिझायनर

४. सॉफ्टवेअर परीक्षक (Software Tester)

५.नेटवर्क अभियंता (Net)work Engineer

गुगलमधील नॉन टेक्निकल जॉब!

१. प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant)

२. कनिष्ठ व्यवसाय विश्लेषक (Junior Business Analyst)

३. एसइओ तज्ञ (SEO Specialist)

४.कॉपीरायटर (Copywriter)

५. खाते व्यवस्थापक (Account Manager)

Google Jobs In India: गुगलमध्ये नोकरी पाहिजे? काय आहे शैक्षणिक पात्रता अन् कशी मिळेल संधी? वाचा महत्वाची माहिती
Ghatkopar Hoarding Accident: मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नको, पत्नीला केलेला कॉल ठरला शेवटचा; ठाण्यातल्या कुटुंबाचा आधारच हिरावला!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com