सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रणधुमाळी रंगणार, हे नक्की आहे. दरम्यान राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ९० ते १०० जागांवर तयारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट ९० ते १०० जागा लढवणार असल्याचा अंदाज आहे.
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा देखील सुरु झालीय. राष्ट्रवादी शरद पवार गटाने नेमलेल्या निरीक्षकांची नुकतीच झूम मीटिंग (Assembly Election) झाली. या मीटिंगमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या सुचना पक्षातील पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत.
शरद पवार गटाची प्राथमिक स्तरावर तयारी असावी, म्हणून १०० च्या जवळपास तयारी सुरु आहे. गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा (Sharad Pawar Group) करा . बूथ कमिटी तयार करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मिळतेय. गणपती उत्सवांनंतर पक्षाला अहवाल दिला जाणार असल्याचं समोर आलंय.
यंदा विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होतील, अशी शक्यता (Vidhan Sabha election) आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. त्यामुळे काँग्रेस देखील जास्त जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे ठाकरे गट देखील अधिकच्या जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर शरद पवार गटाने १०० जागांसाठी तयारी सुरू (Maharashtra Politics) केलीय. परंतु अद्याप महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाहीये. त्यामुळे कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.