ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ग्रीन टीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
ग्रीन टीचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होते.
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स आढळतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाते. परंतु, ग्रीन टी केसांसाठी देखील फायदेशीर ठरते.
केसांना ग्रीन टी लावल्यामुळे केस गळतीची समस्या दूर होते.
ग्रीन टीमध्ये अँटि फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे कोंड्याची समस्या दूर होते.
ग्रीन टी केसांना लावल्यामुळे ते चमकदार आणि मऊ होतात.
ग्रीन टीच्या वापरामुळे केसांना योग्य पोषण मिळण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.