Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: रिझर्व्ह बँकेत HR, लंच ब्रेकमध्ये अभ्यास; कोणत्याही क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सृष्टी डबास यांचा प्रवास

Success Story of IAS Srishti Dabas: आयएएस सृष्टी डबास यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी रिझर्व्ह बँकेत नोकरी करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन अनेकजण मोठ्या पदावर काम करतात. आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न पाहणारे तरुण यूपीएससी परीक्षा देतात. परंतु अनेकदा यूपीएससी परीक्षेत अपयश येते. खूप कमी लोकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळतं. असंच यश IAS सृष्टी डबास यांना मिळालं आहे. (Success Story)

सृष्टी डबास यांनी २०२३ च्या यूपीएससी परीक्षेत सहावी रँक (UPSC Rank) मिळवली आहे. सृष्टी यांनी एकूण १०४८ गुण प्राप्त केले.

सृष्टी डबास यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवलं आहे. सृष्टी या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी एचआर म्हणून काम करत होत्या. रिझर्व्ह बँकेत काम करत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. आरबीआमध्ये नोकरीआधी त्यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात काम करत होते. (Success Story Of IAS Shrushti Dabas)

रिझर्व्ह बँकेत फुल टाईम नोकरी करत यूपीएससी परीक्षेची तयारी करणे अवघड होते. सृष्टी या आरबीआयच्या लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करायच्या. लंच ब्रेकमध्ये जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करायच्या. त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते.

सृष्टी यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्यांनी कोणतेही क्लासेस न लावता स्पर्धा परीक्षा क्रॅक केली आहे. अभ्यासासोबतच सृष्टी या उत्तम कथ्थक डान्सर आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सृष्टी डबास यांचा प्रवास खडतर होता. त्यांनी अनेक पुस्तकांमधून अभ्यास केला. त्यांनी इंटरव्ह्यूच्या आधी रोज वर्तमानपत्र आणि करंट अफेयर्सची माहिती ठेवली होती. याचा त्यांना खूप फायदा झाला. सृष्टी यांच्या मते, यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी ही मॅरेथॉन आहे.फक्त धावणे नाही. यूपीएससी परीक्षेची तयारी करणे हा एक लांब पल्ला आहे. त्यासाठी संयम आणि सातत्य असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

Sunday Horoscope : आनंदात, मौजमजा करण्यात जाणार या ३ राशींचा दिवस, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला, लँडिंगवेळी विमानाचा भाग रनवेला धडकला

Maharashtra Live News Update: वीज पडून 23 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू,वर्ध्यातील घटना

SCROLL FOR NEXT