Success Story: आधी डॉक्टर झाली, मग पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये मिळवली दुसरी रँक; IAS रेनू राज यांचा प्रवास वाचा

Success Story Of IAS Renu Raj: आयएएस अधिकारी रेनू राज यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली आहे. त्या डॉक्टर असतानाही त्यांना देशसेवा करायची होती.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचे काही न काही स्वप्न असते. हे स्व्पन पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अशीच मेहनत रेनू राज यांनी केली. त्या पहिल्या डॉक्टर झाल्या. डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डॉक्टर असूनही स्पर्धा परीक्षा दिली अन् त्यात यश मिळवलं. (Success Story)

Success Story
Success Story: पोस्ट ऑफिसची नोकरी सोडली, लोकांचे टोमणे ऐकले, पण खचला नाही, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS निशांत जैन यांचा प्रवास

रेनू राज या मूळच्या केरळच्या रहिवासी. त्यांनी केरळच्या कोयट्टममधील एका शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या सर्जन म्हणून कार्यरत झाल्या. परंतु त्यांनी सर्जनचे काम करता करता यूपीएससी परीक्षेची तयारी केली.त्यांनी या परीक्षेत यशदेखील मिळवलं. (Success Story of IAS Renu Raj)

केरलच्या कॅडरमधून रेनू राज या आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत झाल्या. त्यांनी ऑल इंडिया रँकमधून दुसरा क्रमांक मिळवला. डॉ. रेनू राज यांचे नाव सर्वात उत्तम कामगिरी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये येते. त्यांचे वडिल रिटायर्ड ऑफिसर आहेत. तर आई गृहिणी आहेत. रेनी यांच्या दोन्ही बहिणी डॉक्टर आहेत. (Doctor To IAS Journey Of Renu Raj)

Success Story
Success Story: वाशिमच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं! ८ एकरात संत्रा लागवड, वर्षाला ४८ लाखांची कमाई

डॉक्टर रेनू राज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना जास्तीत जास्त लोकांची मदत करायची आहे. परंतु डॉक्टर बनून ५० किंवा १०० रुग्णांचीच मदत करु शकणार होत्या. परंतु आयएएस अधिकारी झाली तर हजारो लोकांची मदत करेन असा विचार त्यांच्या मनात आला त्यामुळे त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

रेनू यांनी खूप कमी वयात हे यश मिळवलं आहे. त्यांनी डॉक्टर असतानाही स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात यशदेखील मिळवलं. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Success Story
Success Story: कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; २१ व्या वर्षी IAS होणारे सक्षम गोयल आहेत तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com