
भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
Anjali Damania Walmik Karad : सरपंच हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणी मकोकांतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. अंजली दमानियांनी वाल्मिकला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनंतर आपला मोर्चा वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या बीडचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्याकडे वळवलाय. अंजली दमानियांनी डॉ. अशोक थोरातांची संपूर्ण कुंडलीच काढलीय.
- दमानियांनी काढली कराडच्या डॉक्टरची कुंडली
- डॉ. अशोक थोरात यांचे राजकीय लागेबांधे
- डॉ. अशोक थोरातांवर वेगवेगळे २४ आरोप
- भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे थोरात यांची नाशिकला बदली
- धनंजय मुंडे आणि कराडमुळे भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही पुन्हा बीडला बदली
- सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डॉ. थोरातांकडून पोस्टमार्टम
वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर दोनदा अशोक थोरातांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. कराड ठणठणीत असतानाही 11 रुग्णांना आयसीयूतून बाहेर काढून त्यावर उपचार करण्यात आल्याचा दावा दावा दमानियांनी केला आहे. दमानियांनी आरोप केलेले डॉ. अशोक थोरात कोण आहेत पाहुया.
कोण आहेत डॉ अशोक थोरात?
- डॉ. अशोक थोरात यांचे अंबाजोगाईत पियुष इन हॉटेल
- बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक
- माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी म्हणून काम
- लोकसभेत शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी थोरातांची चर्चा
डॉ. अशोक थोरात यांच्या देखरेखीखालीच सरपंच संतोष देशमुख यांचं पोस्टमार्टम झालं असल्यानं त्या अहवालवरतीही दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी सवाल उपस्थित केलाय. सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीतील अधिकारी वाल्मिकच्या गँगमधील असल्याचे आरोप झाल्यानंतर सरकारवर एसआयटीतील अधिकारी बदलण्याची नामुष्की ओढावली. त्यातच आता बीडचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात कराडच्या गँगमधील असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे डॉ. अशोक थोरातांची चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.