Government Servants Village
Government Servants VillageSaam Tv

Government Servants Village: कोणी आयएएस, कोणी आयपीएस तर कोणी डॉक्टर; या गावातल्या घरा घरात सरकारी अधिकारी!

Government Servants Village In India: भारत देशात एक गाव असंही आहे जिथे प्रत्येक घरातील एक व्यक्ती सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या गावाचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा.
Published on

आपला मुलगा खूप मोठा व्हावा, त्याने आयुष्यात प्रगती करावी अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. आपला मुलगा सरकारी नोकरीत रुजू व्हावा, असं पालकांचं स्वप्न असतं. परंतु आपल्या गावातील प्रत्येक मुलाने सरकारी नोकरी करावी, अशी संपूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यांची हीच इच्छा गावातील अनेक मुलांनी पूर्ण केली आहे. मध्य प्रदेशमधील एका गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सरकारी नोकरी करत आहे. (Government Employees Village)

Government Servants Village
Success Story: गर्लफ्रेंडला देण्यासाठी ताजी फुले मिळाली नाहीत, तर पठ्ठ्यानं उभारली २०० कोटींची कंपनी; बॉयफ्रेंडच्या यशाची कहाणी वाचा

अधिकाऱ्यांचं गाव

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील पडियाल (Madhya Pradesh Padiyal Village) गावात प्रत्येक घरात एकतरी सरकारी नोकरीत आहे. या गावातील अनेक मुले अधिकारी पदावर कार्यरत आहे. अधिकाऱ्यांचं गाव म्हणून या नावाने पडियाल गाव ओळखले जाते. या गावातील प्रत्येक घरातील किमान एकतरी व्यक्ती सरकारी नोकरी करत आहे. १०० हून अधिक मुले देशातील विविध भागात उच्च पदावर कार्यरत आहे.

दुर्गम आदिवासी बहुल असलेल्या या गावात जवळपास सर्वजण साक्षर आहेत. गावातील ९० पेक्षा जास्त जण हे शिक्षित हेत. देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासूनच गावातील तरुणांनी स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवण्यास सुरुवात केली. (90% people Are Educated)

पडियाल या गावाची लोकसंख्या सुमारे ५,५५० आहे. त्यातील ९० लोक साक्षर आहेत.गावातील तरुण हे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे.२०२४ मध्ये १०० तरुण- तरुणी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Government Servants Village
Success Story: IIT पास, ७ वेळा स्टार्टअप अपयशी, जिद्द सोडली नाही... उभारली कोट्यवधींची कंपनी;Rapido च्या यशामागची कहाणी वाचा

पडियालमधील प्रत्येक मुलं हे अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. तर गावातील अनेक मुले ही परदेशात स्वतः चा व्यवसाय करत आहे. या गावातील मुले ही आयपीएस, आयएएस, डॉक्टर, इंजिनियर, वन अधिकारी, वकील आणि न्यायाधीश आहेत.

मध्य प्रदेशमधील या गावाने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. सरकारी नोकरीत रुजू होऊन आपल्या देशासाठी काहीतरी करायची इच्छा या देशातील तरुणांमध्ये आहे. या गावातील तरुणांमुळे इतर तरुणांना प्रेरणा मिळणार आहे.

Government Servants Village
Success Story: सरकारी शाळेत ३६ वर्षे शिक्षिका, टेरेसवर केली शेती; आता महिन्याला कमावते लाखो रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com