IAS Himanshu Gupta Saam Tv
बिझनेस

Success Story: शाळेत जाण्यासाठी रोज ७० किमी प्रवास, बिकट परिस्थितीवर मात करुन चहावाल्याचा मुलगा झाला IAS, हिमांशु गुप्ता यांची यशोगाथा

Success Story Of IAS Himashu Gupta: कितीही खडतर परिस्थिती असली तरी त्यावर जो व्यक्ती मात करतो तो यशस्वी होतो. असंच यश आयएएस हिमांशु गुप्ता यांना मिळालं आहे.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत आणि कामात सातत्य ठेवावे लागते.जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकतात. आयुष्यात कितीही खडतर परिस्थितीवर तुम्ही मात करु शकतात. असंच यश आयएएस हिमांशु गुप्ता यांनी मिळवलं आहे. हिमांशु गुप्ता यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक करुन स्वतः ला सिद्ध केले आहे.

हिमांशु यांचे वडील मजुरी करायचे. तसेच हिमांशु हे स्वतः चहा विकायचे. चहा विकून त्यांनी आपला खर्च भागवला आहे. आज ते एक आयएएस अधिकारी आहेत. (Success Story)

हिमांशु गुप्ता यांचे बालपण अत्यंत गरीबीत गेले. त्यांनी शाळेत जाण्यात रोज ७० किमीचा प्रवास केला. तसेच वडिलांना मदत करण्यासाठी चहाच्या दुकानातदेखील काम केले. हिमांशु गुप्ता हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. हिमांशुचे आईवडिल साक्षर नाही आहेत. तरीही त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही.

हिमांशु गुप्ता यांनी २०१८ साली पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. तेव्हा त्यांनी रेल्वे वाहतूक पोलिस सेवा येथे काम केले. त्यानंतर त्यांनी २०१९ साली पुन्हा परीक्षा दिली. तेव्हा ते आयपीएस झाले. त्यानंतर २०२० साली त्यांनी तिसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली.यावेळी ते आयएएस म्हणून कार्यरत झाले. (IAS Himashu Gupta Success Story)

हिमांशु गुप्ता यांची शाळा ३५ किलोमीटर लांब होती. त्यामुळे रोज येण्या-जाण्याचे ७० किमी होते. अनेकदा त्यांचे वर्गमित्र त्यांच्या चहाच्या स्टॉलजवळून जातात. तेव्हा ते लपून बसायचे. परंतु एकदा त्यांच्या मित्रांनी त्यांना पाहिले.तेव्हापासून ते हिमांशु यांना चहावाला म्हणून चिडवायला लागले. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्याकाळी ते घर चालवण्यासाठी दिवसाला ४०० रुपये मिळवायचे. अशा परिस्थितीतही त्यांनी खूप मेहनत केली आणि सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. (UPSC Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

SCROLL FOR NEXT