आपण कितीही मोठे झालो तरीही बालपण हे सर्वांसाठीच खास असते. बालपणीच्या आठवणीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळा. शाळा, शाळेतील गमती जमती यामुळे आपले बालपण अजूनच खास होते. त्यात गावाकडची शाळा ही खूपच स्पेशल असते. रोज सकाळीच गावच्या शाळेची घंटा वाजते. शाळेतील पोरं खूप जास्त मस्ती करतात. एकमेकांच्या घरी जाऊन त्यांना उठवतात आणि शाळेत घेऊन जातात. असाच एक शाळकरी मुलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कोणालाच शाळेत जायला आवडत नाही. म्हणून अनेकजण सुट्टी मारतात. परंतु आपला एखादा मित्र असा असतो की जो आपल्या घरी येऊन आपल्याला उठवतो.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video)
व्हायरल व्हिडिओत दोन मुले सकाळी-सकाळी शाळेत जाताना दिसत आहेत.त्यांच्या बोलण्यावरुन त्यांना सुट्ट्या असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत एक मुलगा म्हणतो की, आज सुट्ट्यानंतर शाळेचा पहिला दिवस आहे. मला तर शाळेत जायचं नव्हतं. पण हा आला आणि मला उठवलं. आता शाळेत घेऊन चाललाय.
त्यानंतर बाईकवरचा मुलगा त्यांना विचारतो की, काय रे, तुमच्यामध्ये सर्वात हुशार कोण?त्यावर एक मुलगा सांगतो की, याला परीक्षेत २०पैकी फक्त २ मार्क होते. मला २० पैकी ४ मार्क होते. त्यानंतर बाईकवरचा मुलगा त्यांनी दोन-दोन पेन देतो आणि खूप अभ्यास करा असं सांगतो. या दोघांचा हा क्युट आणि मनाला भावणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video Of School Going Childrens)
'बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा' हे वाक्य ऐकताच बालपणीच्या सर्व आठवणी डोळ्यांसमोरुन जातात. अनेकदा आपल्याला पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही परत एकदा शाळेत जावेसे वाटेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.