Success Story Saam tv
बिझनेस

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, वडील दूध विकायचे, लेकीने एकदा नव्हे तर दोनदा केली क्रॅक; IAS अनुराधा पाल यांचा प्रवास

Success Story of IAS Anuradha Pal: आयएएस अनुराधा पाल यांनी दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांची आर्थिक परिस्थिती फारच बेताची होती. त्यांनी या परिस्थितीवर मात देत यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

IAS अनुराधा पाल यांचा प्रेरणादायी प्रवास

एकदा नव्हे दोनदा यूपीएससी क्रॅक

वडील दूध विकायचे

परिस्थिती कशीही असली तरी त्यावर मात करता यायला हवी. तुमची स्वप्ने जर मोठी असतील तर ती पूर्ण करण्याची ताकद तुम्हाला मिळतेच. फक्त आपल्या हातात असतात ते म्हणजे प्रयत्न. तुम्ही जर सतत प्रयत्न केले तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळते. असंच यश आयएएस अनुराधा पाल यांना मिळालं. दूध विक्रेत्याची लेक आयएएस अधिकारी झाली आहे.

दोनदा यूपीएससी क्रॅक

अनुराधा पाल या मूळच्या उत्तराखंडच्या रहिवासी आहेत. त्यांनी खूप मेहनतीने आणि आत्मविश्वासाने एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी ६२वी रँक प्राप्त केली.

आर्थिक परिस्थिती बेताची

अनुराधा यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांचे वडील दूध विकून कुटुंबाचे पालनपोषण करायचे. त्यांनी आपले शिक्षण जवाहर येथूल नवोदय विद्यालयातून पूर्ण केले. त्यांनी जीबी पंत युनिव्हर्सिटीमधून इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. घरातील परिस्थिती फार बरी नसल्याने त्यांनी प्रायव्हेट नोकरी करण्यास सुरुवात केली.

नोकरी करताना त्यांना समजले की, यूपीएससी परीक्षा हे त्यांचे लक्ष्य आहे. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. याचदरम्यान, त्यांनी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केले.

अनुराधा यांनी २०१२ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि ती पासदेखील केली. त्यांनी ४५१ रँक मिळाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०१५ मध्ये परीक्षा दिली. यावेळी त्यांना ६२वी रँक प्राप्त झाली. त्यानंतर त्या आयएएस पदावर रुजू झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील १५ उड्डाणपूल बंद

Shocking: स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदा काम', २० तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं; पोलिसांनी धाड टाकत...

Bigg Boss Marathi 6 : पाया पडली, हात जोडले; पॉवर KEY साठी करणसमोर रुचिता ढसाढसा रडली, पाहा VIDEO

Khan Saree Blouse Designs: खण साडीचा नवा थाट! संक्रांतीला ट्राय करा 'हे' लेटेस्ट ब्लाउज पॅटर्न आणि ज्वेलरी

Gold Rate Today: मकरसंक्रांतीला सोन्याचे भाव खाल्ला; १० तोळ्यामागे १०,९०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT