Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: त्सुनामित घर गेलं, शेतकऱ्याच्या लेकींनी जिद्दीने क्रॅक केली UPSC; एक IAS तर दुसरी IPS अधिकारी

Success Story of IAS Ishwarya Ramnathan And Sushmita Ramnathan: तमिळनाडूतील दोन बहिणींनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. एक आयएएस तर दुसरी आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

Siddhi Hande

दोन बहिणींचा यूपीएससीचा प्रवास

एक बहीण आयएएस तर दुसरी आयपीएस

खडतर परिस्थितीतून घेतलं शिक्षण

यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत रुजू होण्याची लाखो तरुणांची इच्छा असते. परंतु यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला दिवसरात्र मेहनत करावी लागते आणि या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळतेच. असंच काहीसं तामिळनाडूतील दोन बहि‍णींनी केलं. सुष्मिता आणि ईश्वरच्या रामनाथन यांनी खूप खडतर परिस्थितीतून यूपीएससी परीक्षा पास केली. शेतकऱ्याच्या दोन्ही लेकींनी आपल्या आईवडिलांचे नाव मोठे केले आहे. (Success Story of Two Sisters)

दोन्ही बहिणी झाल्या IAS आणि IPS

ईश्वरच्या यांनी २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्या आयएएस अधिकारी झाल्या. तर सुष्मिता यांनी २०२२ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यानंतर त्या आयपीएस झाल्या. सुष्मिता आणि ईश्वर्या यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. २००४ रोजी आलेल्या त्सुनामीत त्यांचे घरदेखील उद्धवस्त झाले होते. मात्र, कितीही संकट आले तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांनी मोठ्या जिद्दीने अभ्यास केला आणि यूपीएससी परीक्षा पास केली.

सुष्मिता आणि ईश्वर्या यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली, ईश्वर्या यांनी पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा केली. तेव्हा त्यांना ६२८ रँक मिळाली. त्यानंतर त्यांनी पुन्ही यूपीएससी परीक्षा दिली. २०१९ मध्ये त्यांनी ४४ रँक मिळवली. यानंतर त्या आयएएस अधिकारी झाल्या.

बहीण आयएएस झाल्यानंतर सुष्मिता यांनीही प्रेरणा घेतली. त्यांना यूपीएससी परीक्षेत मात्र अनेकदा अपयश मिळाले. त्यांना सलग पाचवेळा अपयश आले. परंतु सहाव्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्या सध्या आयपीएस म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT