Amol Mitkari: अमोल मिटकरींचा अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीवर संशय, UPSC कडे चौकशीची मागणी|VIDEO

Amol Mitkari Demand Probe Into Anjana Krishna: अजित पवार यांच्याशी वादग्रस्त व्हिडिओनंतर IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या निवड प्रक्रियेची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
Summary

अजित पवारांवरच्या व्हिडिओ वादानंतर नवा वाद पेटला

आमदार अमोल मिटकरी यांनी अंजना कृष्णांच्या नियुक्तीवर संशय व्यक्त केला

अंजना कृष्णा या "मग्रूर अधिकारी" असल्याचे मिटकरी यांचे वक्तव्य

पूजा खेडकर प्रकरणासारखी चौकशी अंजना कृष्णांच्या निवड प्रक्रियेबाबतही करावी, अशी मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यानंतर सामान्य लोकांनी देखील यावर अजित पवारांवर निशाणा साधलाय तर विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे याच मुद्याला आता वेगळे वळण मिळाले आहे. आयपीएसअधिकारी अंजना कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगतील नेमणुकीची चौकशी करा अशी मोठी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

ते म्हणाले, अंजना कृष्णा या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसल्याचे म्हणणं हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. अंजना कृष्णा या मग्रूर अधिकारी आहे. तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे नाव माहित नसलेल्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती संशयास्पद आहे. पूजा खेडकर प्रकरनाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. अंजना कृष्णा यांच्या नेमणुकी संदर्भात राज्य सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार करणार असल्याची आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com