संजय राठोड, साम टीव्ही, प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपावरून राजकारण तापू शकतं. याचं कारण म्हणजे महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते आपल्या पक्षाला अधिक जागा मिळतील, असं म्हणत थेट आकडा जाहीर करत वक्तव्य करताना दिसत आहेत. अलीकडेच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गट आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात 120 जागा लढवेल, असा दावा केला होता.
यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही जागावाटपावरून मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''जिथे राष्ट्रवादी मजबूत तिथं जागा मागणार.'' यवतमाळ येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतही वक्तव्य केलं आहे. अमोल मिटकरी म्हणाले आहेत की, ''येत्या काळात पक्षाने आदेश दिला तर आकोट विधानसभा लढणार.'' ते म्हणाले आहेत की, ''यवतमाळ जिल्ह्यातील सात पैकी तीन जागा राष्ट्रवादी अजित पवार गट मागत आहे. त्यामध्ये यवतमाळ, दिग्रस आणि पुसद या विधानसभेचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटबद्दल बोलताना मिटकरी म्हणले की, ''गुलाबी रंग लोकांना आवडतो. तो रंग लोकांना आकर्षित करतो, म्हणून सध्या तो रंग वापरला जातोय. कुठल्या बाबा बुवाचा ऐकून तो रंग वापरला जात नाही.''
भाजप आमदार नितेश राणे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, महायुतीतील आमदार नितेश राणे हे वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांना त्यांच्या पक्षाने रोखायला पाहिजे, अनेकदा याबाबत गोची होते. मात्र सांगणार कुणाला, असंही मिटकरी म्हणाले.
दरम्यान, अमोल मिटकरी यवतमाळ विश्रामगृहात आले असता त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. त्यावर त्यांनी सांगितले की, नारेबाजी करण्याऐवजी त्यांनी भेटून जर निवेदन दिलं असतं तर बोलता आलं असतं. यावर त्यांनी शेरो शायारित विरोधकांना टोला लागवला आहे. आम्ही बेवफा असेल तर तुम्ही वफा सिद्ध करायला हवी, आम्ही बोलायला बसलो तर खूप काही निघेल, असं ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.