Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! MIM ने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार केले जाहीर; कोणाला कुठून दिलं तिकीट? वाचा...

Aimim Candidate List 2024 Maharashtra: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने आपल्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
मोठी बातमी! MIM ने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार केले जाहीर; कोणाला कुठून दिलं तिकीट? वाचा...
Asaduddin OwaisiSaam Tv
Published On

Maharashtra Political Updates: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी एमआयमचे ५ उमेदवार जाहीर केले आहेत.

यातच पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा ओवैसी यांनी विश्वास दाखवत त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच सोलापूर विधानसभा मतदारसंघातून फारुख शब्दी, मालेगाव येथून मुफ्ती इस्माईल, धुळे येथून फारुख शहा आणि मुंबईत फैयाज अहमद खान यांच्या नावाची घोषणा केली आहे.

मोठी बातमी! MIM ने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार केले जाहीर; कोणाला कुठून दिलं तिकीट? वाचा...
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुका वेळेत होणार? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले संकेत, वाचा सविस्तर

या पत्रकार परिषदेत बोलता असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ बोर्डाचा मुद्दाही उपस्थित केला. यावर बोलताना ते म्हणाले की, वक्फच्या जागा या सरकारी नाही, खाजगी जागा आहे. मोदी सरकार याला संपविण्यासाठी हे बिल आणले आहेत. या बिल विरोधात क्यूआर कोड मार्फत विरोध दर्शवावा.

ते म्हणाले, ''मोदी बोलतात २०० वर्ष जुने कागद घेऊन या. मोदी हे जिल्हाधिकारी यांना जास्तीचे अधिकार देत आहेत. नरेंद्र मोदी मुस्लीमांकडून जमीन हिसकावून घेत आहेत.'' ओवैसी म्हणाले, ''हे कायदा बनवत आहेत. मात्र देशातील सर्व पक्षांनी विचार केला पाहिजे. हा कायदा वक्फ वाचविण्यासाठी नाही, तर हा कायदा वक्फ संपविण्यासाठी आहे.''

मोठी बातमी! MIM ने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार केले जाहीर; कोणाला कुठून दिलं तिकीट? वाचा...
Lalbaugcha Raja 2024 : पहिल्याच दिवशी धक्काबुकी, रेटारेटी; लालबागचा राजा मंडपातील घटना कॅमेरात कैद , पाहा VIDEO

असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की, ''सबका साथ, सब का विकास, साबका विश्वास हा फक्त धोका आहे. अनेक राज्यात मुस्लिमांवर बुलडोझर चालविले जात आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com