Maharashtra Political Updates: राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक वेळेत होणार असल्याचे संकेत मिळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी वेळेतच तयारी सुरु करावी लागणार आहे.
राज्याचे मुख्य अधिकारी १३ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढाव घेणार असल्याचे निश्चित झालं आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहे. अधिकारी हे निवडणूक कर्मचारी, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र, मतदार यादी, कायदा आणि सुव्यवस्था , मतदान साहित्य याचा आढावा घेणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होणार असल्याचं निश्चित झालं आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेणार आहेत. अधिकारी नागपूर विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग, कोकण विभाग, मुंबई शहरातील तयारीचा आढावा घेणार आहेत.
या बैठकीत मतदान कर्मचारी वर्गाची निश्चिती, कायदा-सुव्यवस्थेचा आढावा, सेक्टर ऑफिसर, सेक्टर पोलीस ऑफिसरची नियुक्ती, पोलीस कर्मचारी आवश्यकता याबाबत अधिकारी आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्राची तपासणी, मतमोजणी केंद्राचे प्रस्ताव, मतदान साहित्याचा आढावा, मतदारयांद्याचा निरंतर अद्ययावताचा आढावा, एनजीआरएस, मीडिया रुम, निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण याचा आढावा घेण्यात येणार आहे.
दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.