Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार, काय आहे कारण?

Lalbaugcha Raja News: लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार, काय आहे कारण?
Lalbaugcha Raja 2023
Lalbaugcha Raja 2023Saam Tv
Published On

Lalbaugcha Raja News:

लालबागच्या राजाचं दर्शन घेताना भाविकांना होत असलेल्या त्रासा विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंडळ आणि पोलिसांकडून योग्य व्यवस्थापन न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

उद्या काही अघटित घटना घडल्यास त्याला मंडळ, पोलीस तसेच राज्य शासन जबाबदार असेल. तसेच असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. मंडळाचे कार्यकर्ते महिला भक्तांना देत असलेल्या वागणूकीबाबत देखील तक्रार अर्जात आक्षेप घेण्यात आला आहे.

Lalbaugcha Raja 2023
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत अरुणाचलच्या खेळाडूंना प्रवेश देण्यास चीनचा नकार, भारताने दिलं कडक उत्तर...

तक्रारीत काय नमूद करण्यात आलं आहे?

वकील आशिष राय यांनी ही तक्रार मुंबई पोलीस आयुक्तांना दिली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे की, मुंबईतील लालबाग परिसरात गेल्या ९० वर्षांपासून लालबागचा राजा विराजमान आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांना अनेक तास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते.  (Latest Marathi News)

त्यात लहान मुलं, महिला, वृद्ध जोडपे व इतर सर्वसामान्य नागरिक आपला जीव धोक्यात घालून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी 24 तास एकाच रांगेत उभे असतात. कोणत्याही मूलभूत आणि संवैधानिक संरक्षण आणि सुविधेशिवाय 48 तास प्रतीक्षा करावी लागेल. येथे मुलं, महिला व वृद्ध जोडप्यांसाठी संस्थेकडून कोणतीही विशेष व्यवस्था करण्यात आलेली नाही.

Lalbaugcha Raja 2023
Thackeray vs Shinde: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमनेसामने येणार? दिल्लीतून आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष अॅक्शन मोडवर

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आलं आहे की, संस्थेचे पंडाल व्यवस्थापक आणि पोलीस प्रशासनातील उपस्थित अधिकारी यांच्याकडून लोकांना दर्शन घेण्यासाठी पुरेशा योग्य व्यवस्थेचा अभाव असल्याचे येथे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी चेंगराचेंगरीसारखी घटना घडल्यास, त्यास पंडाल जबाबदार राहील, अशी शक्यता नाकारता येत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com