Schemes Saam Tv
बिझनेस

Schemes: भारताप्रमाणे या देशांमध्येही चालते आयुष्मान भारत योजना; फरक काय? जाणून घ्या सविस्तर

Some International Countries Health Scheme: देशात नागरिकांच्या हितासाठी आयुष्मान भारत योजना राबवली आहे. इतर अनेक देशांमध्यही आयुष्मान भारतसारख्या योजना राबवण्यात आल्या आहेत.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना राबवली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांचे ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहे. या योजनेत आता ७० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील उमेदवारांनादेखील ५ लाखांपर्यंत उपचार मिळणार आहे. त्यामुळे ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा मिळणार आहे.या योजनेत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर क्लेमचे पैसे सरकारकडून मिळतात. देशासारख्या इतर अनेक देशातही आयुष्मान भारत योजनेसारख्या योजना राबवल्या आहेत. चला तर मग इतर देशातील योजनांबद्दल जाणून घेऊया.

ब्रिटन (Britan)

ब्रिटन देशात नॅशनल हेल्थ सर्व्हिस आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसअंतर्गत ब्रिटिश नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते. सरकारकडून कराच्या माध्यमातून निधी दिला जातो. NHS अंतर्गत, रुग्णालयात दाखल करणे, औषधे आणि दाताचा उपचार मोफत केला जातो.

अमेरिका (America)

अमेरिकेत मेडिकेअर योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील व्यक्ती आणि काही ठरावीक आजारांनी ग्रस्त असलेल्या तरुणांना आरोग्य सेवा दिली जाते. याचा खर्च पगारातून वजा केला जातो. काही भाग त्या व्यक्तीला स्वतः ला भरावा लागतो.

कॅनडा (Canada)

कॅनडा हेल्थ अॅक्टअंतर्गत सर्व नागरिकांना आण कायमस्वरुपी रहिवाशांना मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते.याचा खर्च प्रादेशिक सरकार किंवा फेडरल सरकार उचलतात. यामध्ये रुग्णालयांपासून ते औषधांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया (Australia)

ऑस्ट्रेलियात मेडिकेयर ऑस्ट्रेलिया योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. याचा खर्च सरकर टॅक्सच्या माध्यमातून जमा करते. यामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापासून ते औषधांपर्यंत सर्व खर्च होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मध्य रेल्वेवर मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

SCROLL FOR NEXT