Share Market Down : शेअर बाजारात का होत आहे मोठी घसरण; अमेरिका, चीनच नाही तर ही आहेत प्रमुख कारणं

Share Market : शेअर बाजारात सलग १४ दिवस तेजी होती, मंगळवारपासून सेन्सेक्समध्ये सुमारे 1.70 टक्के म्हणजेच 1400 पेक्षा जास्त अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे.
Share Market Down
Share Market Down Saam Digital
Published On

भारतीय शेअर बाजारात मागच्या काही दिवसांमध्ये मोठी तेजी पहायला मिळाली होती मात्र आता सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड पहायला मिळाली आहे. मंगळवारपासून सेन्सेक्समध्ये सुमारे 1.70 टक्के म्हणजेच 1400 पेक्षा जास्त अंकांची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमागे अमेरिका आणि चीनच्या कमकूवत आर्थिक आकडेवारीचं कारणं सांगितलं जात आहे. पण शेअर बाजारातील घसरणीमागे फक्त ही दोनच कारणं महत्त्वाची नाहीत. तर शेअर बाजाराचे उच्च मूल्यांकन (हाय व्हॅल्यूएशन) महत्त्वाचं कारण आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांकडून विक्री केली जात आहे.

Share Market Down
SEBI : माधबी बुच यांच्यामुळे चर्चेत आलेली 'सेबी' नक्की काय काम करते? शेअर मार्केटशी आहे थेट संबंध, एकदा वाचाच

रुपयाची घसरण आणि डॉलर इंडेक्स पुन्हा एकदा मजबूत होणे हे देखील शेअर बाजारावर परिणाम करत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया रिकॉर्ड 84 रुपयांवर पोहोचला आहे. आशियामध्ये भारतीय रुपयाला सर्वात कमकूवत करन्सींपैकी एक मानलं जात आहे. शिवाय सप्टेंबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांची विक्री स्पष्टपणे दिसून येत आहे. याचा परिणाम बाजारावर स्पष्टपणे दिसत आहे. पुढील एक आठवड्यात महागाईचे आकडे समोर येतील . ऑगस्ट महिन्याचा डेटा जुलै महिन्याच्या तुलनेत तसाच असणार नाही. सर्वात मोठा घटक फूड इन्फ्लेशन असणार आहे, जे सतत उच्च पातळीवर आहे.

शेअर बाजारातील घरणीमागची प्रमुख कारणं

शेअर बाजारातील नफावसुली: या आठवड्यात बुधवारी भारतीय शेअर बाजारात विक्री सुरू होण्याआधी, बाजारात 14 दिवस तेजी होती. सध्या शेअर बाजार उच्च मूल्यांकनात असल्याने गुंतवणूकदारांकडून नफावसुली दिसत आहे. एसएमसी ग्लोबल सिक्योरिटीजच्या सीनियर इक्विटी रिसर्च एनालिस्ट सीमा श्रीवास्तव यांनी, भारतीय शेअर बाजारात अधिक खरेदी झाली आहे. त्यामुळे सध्याची सेलऑफ फक्त नफावसुली म्हणून घेतली जावी.

रुपयात घसरण: भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे. सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत 84 च्या पातळीवर दिसत आहे. हे देखील शेअर बाजारात घसरणीचे एक कारण आहे. गेल्या 15 दिवसांत रुपयात 0.13 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. तर वर्षभरात रुपयात 1 टक्के घसरण झाली आहे.

डॉलर इंडेक्समध्ये सुधारणा : डॉलर इंडेक्समध्ये सुधारणा दिसत आहे. मागील एका महिन्यात 2.12 टक्क्यांची घसरण झाली आहे, तर एका वर्षात 4 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते, डॉलर रीबाउंड करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे शेअर बाजारात घसरण दिसत आहे. सध्या डॉलर इंडेक्स 101 च्या पातळीवर आहे.

Share Market Down
Tata Company Real Owner : टाटा कंपनीचा कोण आहे खरा मालक? कोण चालवतं १०० हून अधिक कंपन्या? वाचा सविस्तर

विदेशी गुंतवणूकदारांची उदासीनता: गेल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे. आकडेवारीनुसार, गुरुवारी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून गुंतवणून काढून घेतली. एका दिवसाआधी विदेशी गुंतवणूकदारांनी 688.69 कोटी रुपयांची विक्री केली. चालू महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 11,882 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

यूएस फेड बैठक: प्रोफिटमार्ट सिक्योरिटीजचे रिसर्च हेड अविनाश गोरक्षकर यांनी सांगितले की, बाजारात घसरणीचे मुख्य कारण म्हणजे या महिन्यात होणाऱ्या यूएस फेड बैठकीत व्याज दरात कपात करण्याबाबतची अनिश्चितता आहे. जर यूएस फेडने 25 बीपीएस व्याज दरात कपात जाहीर केली तर बाजार त्या निर्णयावर खूश होणार नाही. 50 बेसिस प्वाइंटची कपात शेअर बाजाराला नवीन ऊर्जा देऊ शकते.

अमेरिकेतील नोकरी आकडे: जुलैमध्ये अमेरिकेतील नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. ज्यामुळे अमेरिकी श्रम बाजारात मंदी आली आहे. यामुळे भारतासह जगभरातील शेअर बाजारात घसरणीचा सामना करावा लागला आहे.

अमेरिकेत महागाईचा धोका: अमेरिकेतील श्रम बाजारातील मंदीच्या शक्यतेमुळे अमेरिकेतील महागाईची चिंता वाढली आहे. त्यामुळे यूएस फेडला व्याज दरात कपात करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागू शकतो. जरी ते त्यांच्या सौम्य दृष्टिकोनावर चालत असले तरी, बाजाराला भीती आहे की यूएस फेड रेट कपात 25 बीपीएस पेक्षा अधिक होणार नाही.

शुक्रवारी शेअर बाजारात सकाळपासून पडझडीला सुरुवात झाली. व्यापार सत्रादरम्यान सेन्सेक्समध्ये 1055.88 अंकी घसरण झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सकाळी शेअर मामुली घसरणीसह 82,171.08 अंकांवर खुला झाला आणि 81,145.28 अंकी पातळीवर दिनाच्या कमी पातळीवर पोहोचला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्समध्ये 1400 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली . दुसरीकडे, निफ्टीत देखील घसरण दिसत आहे. व्यापार सत्रादरम्यान निफ्टीमध्ये 300 पेक्षा जास्त अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे. सध्या निफ्टी 288 अंकी घसरणीसह 24,858 अंकांवर स्थिर आहे.

Share Market Down
State Revenue Sources : राज्यांकडे पैसा येतो तरी कुठून? तिजोरी रिकामी झाली की कर्मचाऱ्यांना पगारही मिळणं होतं मुश्किल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com