'हिंडेनबर्ग रिसर्ज'च्या अहवालामुळे ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ म्हणजेच सेबी आणि या संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी बुच सध्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आहेत. हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर संसदीय लेखा समिती आता माधवी पुरी बुच यांची सप्टेंबरमध्ये चौकशी करणार असल्याची माहिती आहे. मात्र सध्या चर्चेत असलेल्या या भांडवली बाजारातील सर्वात मोठ्या संस्थेविषयी तुम्हाला माहिती आहे का? अगदी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनाही या संस्थेचे परिपूर्ण माहिती नसते, जाणून घेऊया त्यावरचा हा रिपोर्ट
सेबी हे नाव भाडवली बाजारत तसं नवखं नाही, पण हि संस्था पहिल्यांदा प्रकाशझोतात आली ती महिनाभरापूर्वी 'हिंडेनबर्ग रिसर्ज'ने केलेल्या गंभीर आरोंपामुळे. सेबीच्या प्रमख माधबी पुरी बुच अदानी समूहाशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात खळबळ माजली आणि संपूर्ण देशभरात या संस्थेविषयी चर्चा सुरू झाली.
सेबीची स्थापना 1988 मध्ये करण्यात आल झाली, मात्र 1992 मध्ये कायद्याच्या आधारावर अधिकार मिळाले. सेबीच्या स्थापनेपूर्वी भारतीय भांडवली बाजारावर योग्य नियंत्रण नव्हतं, त्यामुळे भ्रष्टाचार आणि फसवणुकीचं प्रमाण अधिक होतं. त्यावेळी कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज (CCI) कडे प्रमुख नियामकाची जबाबदारी होती, मात्र पूर्ण अधिकार नव्हते. भारतीय बाजारपेठेच्या सुरक्षिततेसाठी अधिक शक्तिशाली नियामक संस्थेची गरज लक्षात घेऊन सरकारने भारतीय शेअर बाजाराचे नियमन आणि विकास करण्यासाठी सेबीची स्थापना केली, भारतीय भांडवली बाजारातील हे एक महत्त्वाचं पाऊल होतं.
आज सेबी एक विश्वासार्ह नियामक संस्था असून भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय भांडवली बाजारपेठेचा मोठा विकास झाला आहे, त्यामुळेच आज जागतिक पातळीवर एक अत्यंत गतिशील बाजारपेठ बनली आहे.
नियमन: सेबी शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स, क्रेडिट रेटिंग एजन्सी, डिपॉझिटरी आणि इतर बाजारपेठांशी संबंधित संस्थांचे नियमन करते.
गुंतवणूकदारांचे संरक्षण: सेबी गुंतवणूकदारांचे हितसंबंध जपण्यासाठी नियमावली तयार करते, जेणेकरून त्यांची फसवणूक होऊ नये आणि बाजारात योग्य माहितीचा आधार घेत त्यांना गुंतवणूक करता येईल.
विनिमय सुधारणा: बाजारपेठेतील गैरप्रकार आणि फरवणुकीवर कारवाई करते, तसेच कंपन्यांना योग्य मार्गाने व्यापार करण्यासाठी नियम आणि अटी घालते.
भारतीय आर्थिक बाजारपेठेचा विकास आणि विस्तार सुनिश्चित करते, ज्यामुळे बाजारपेठ जागतिक स्तरावर सक्षम होते.
गुंतवणूक संरक्षण: जर एखादा सामान्य नागरिक शेअर बाजारात, म्युच्युअल फंड्समध्ये किंवा इतर वित्तीय उत्पादनांमध्ये गुंतवणूक करत असेल तर सेबीच्या नियमांमुळे त्याचे पैसे सुरक्षित राहण्याची शक्यता असते.
शिकवण व मार्गदर्शन: सेबी वेळोवेळी गुंतवणूकदारांसाठी शिक्षण कार्यक्रम राबवते, ज्यामुळे ते अधिक साक्षर होतील आणि योग्य गुंतवणूक निर्णय घेऊ शकतील.
तक्रारींचे निवारण: जर कोणी गुंतवणूकदार फसवणुकीचा शिकार झाला असेल, तर तो सेबीकडे तक्रार नोंदवू शकतो. सेबी संबंधित कंपनी किंवा मध्यस्थांवर कारवाई करू शकते.
सेबीमुळे बाजारपेठेतील पारदर्शकता वाढते, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.