Explainer: ६० मिनिटं, १० किमी धावणे; भावी पोलिसांचा श्वास कोंडतोय; खरंच इतकी खडतर चाचणी गरजेची आहे का?

Maharashtra Police Recruitment/Police Bharti Physical Test: झारखंडमध्ये उत्पादन शुल्कच्या ५८३ जांगाच्या भरतीसाठी आलेल्या १२ उमेदवारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ६० मिनिटात १० किमी धावण्यासाऱखी खडतर चाचणी गरजे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Explainer
ExplainerSaam Digital
Published On

संदीप गावडे, साम टीव्ही

Police Bharti Physical Test Updates: सरकारी नोकरी म्हटलं की आठवतो तो गलेलठ्ठ पगार आणि जॉब सिक्युरीटी...या जॉब सिक्युरीटीमुळे कित्येक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असतात... त्यात पोलीस आणि सैन भरती म्हटलं की कमी वयात करिअरची संधी... याच भावनेतून देशभरातून लाखो तरुण पोलीस आणि सैन्य भरतीकडे वळतात... मात्र अलिकडे पोलीस भरतीतील खडतर शारीरिक चाचण्या उमेदवारांसाठी प्राणघातक ठरत आहेत...नुकताच झारखंडमध्ये पोलीस भरती पार पडली... केवळ ५८३ जागा जागांच्या भरतीसाठी १२ उमेदवारांना प्राण गमवावा लागला आहे.

Explainer
Cabinet Seven Big Decisions : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! केंद्राकडून कृषी क्षेत्राला मोठं गिफ्ट

झारखंड उत्पादन शुल्कच्या पदाच्या ५८३ जागांसाठी शारीरिक चाचणीसांठी ५ लाख उमेदवार होते. प्रत्येक केंद्रावर तब्बल 74,400 हजार उमेदवार होते आणि शारीरिक चाचणीची अट होती १० किमी ६० मिनिटात धावणे, मात्र चाचणी सुरू झाली आणि कित्येक तरुणांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणू लागला आणि १२ तरुणांचा मृत्यू झाला... वेळेत ऑक्सिजन पुरवल्यामुळे काही तरुणांचे प्राण वाचले आहेत...यानिमित्त एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे खरंच पोलीस भरतीसाठी इतक्या खडतर प्रशिक्षणाची गरज असते का? किवा अशी शारीरिक चाचणी घेतली तरी उमेदवाराचं आरोग्य आणि केंद्रावरील सुविधांचा विचार केला जातो का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

खरंच पोलीस भरतीसाठी इतक्या खडतर प्रशिक्षणाची गरज असते का? किवा अशी शारीरिक चाचणी घेतली तरी उमेदवाराचं आरोग्य आणि केंद्रावरील सुविधांचा विचार केला जातो का?

भरतीदरम्यान आतापर्यंत २8 तरुणांचा मृत्यू

धक्कादायक म्हणजे देशभरात गेल्या १० वर्षात ११ राज्यामध्ये झालेल्या पोलीस भरतीत जवळपास २८ तरुणांनी जीव गमावला आहे. त्यात एकट्या झारखंडमध्ये ६ दिवसात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात भरती दरम्यान ८ उमेदवारांचा मृत्यू झाला आहे.

Explainer
Jammu Kashmir Election: जम्मू-काश्मीर आणि मागील ३ निवडणुका; 10 वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभेत कुणाची विकेट जाणार?

झारखंड उत्पादन शुल्क- ५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर-२०२४ -१२

  • महाराष्ट्र एसआरपीएफ-- जून २९ ते ३ जुलै २०२४-२

  • पुणे पोलीस - ६ जून २०२४ -१

  • ओडिशा पोलीस- २२-२३ मार्च २०२३ -२

  • मुंबई पोलीस- १७ फेब्रुवारी २०२४ -१

  • दिल्ली पोलीस- १७ मे २०२२-१

  • टीएन पोलीस- ८ नोव्हेंबर २०१९ -१

  • ओडीसा पोलीस ११ ऑगस्ट २०१४ -१

  • आर्मी ५ एप्रिल २०१८-१

  • सीआयएसएफ- १४ जून २०१५-१

  • मुंबई पोलीस-- ११ जून २०१४ --४

  • उत्तर प्रदेश पोलीस--१८ फेब्रुवारी २०२३-१

झारखंडमध्ये झालेल्या या घटनेची चौकशी आणि कारणं तसासण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आरोग्य तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, पोलीस, सैन्य किंवा अन्य कोणत्याही भरतीत शारीरिक चाचणीत सहनशक्तीचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे, असं म्हटलं आहे. तसंच उमेदवारानेही चाचणीदरम्यान थकवा किंवा अशक्तपणासारख्या सूचना आपलं शरीर देत असतं त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

Explainer
IPO Risk Factors : IPO म्हणजे काय? खरंच कोट्यवधी रुपये कमवता येतात का? गुंतवणुकीत किती रिस्क असते? वाचा A टू Z माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com