Tata Company Real Owner : टाटा कंपनीचा कोण आहे खरा मालक? कोण चालवतं १०० हून अधिक कंपन्या? वाचा सविस्तर

Tata Company Share List : जमशेदजी टाटा यांनी स्वातंत्र्यापूर्वी 1868 मध्ये टाटा एक व्यापारी संस्था म्हणून सुरू केली होती, ती आता केवळ देशातच नाही जगातील एक मोठं नावं आहे. लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांसह सुमारे 100 हून अधिक कंपन्या विविध देशांमध्ये पसरलेल्या आहेत.
Tata Company Real Owner
Tata Company Real OwnerSaam Digital
Published On

टाटा म्हटलं की दिल्लीपासून ते गाव खेड्यातील साध्या माणसालाही ज्ञात असलेलं नाव... स्वयंपाक घरापासून ते दिवसभरात वापरात येणाऱ्या वस्तूंमध्ये कुठेना कुठे टाटा ब्रँड असतोच असतो...मग तो दिवसाची सुरुवात चांगली करणारा चहा असो की जेवणाला चव आणणारं मीठ असो. जवळपास १५० वर्षांच्या इतिहासात भारतीयांच्या मनातील टाटा कंपनीने एक विश्वास निर्माण केला आहे, टाटासोबत देशाचं एक भावनिक नातं आहे...मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेलच की जगभरात १०० कंपनीचा डोलारा सांभाळणाऱ्या या कंपनीचा खरा मालक कोण? कोण सांभाळतं याचा सर्व कारभार? कसे घेतले जातात इतक्या मोठ्या कंपनीचे निर्णय? पाहूयात एक रिपोर्ट..

Tata Company Real Owner
19 Metro City Crime Rate : खरंच कोलकाता सुरक्षित शहर आहे का ? ममतांचा दावा खरा की खोटा, NCRB चा अहवाल काय सांगताे?

टाटाचा प्रवास कसा सुरू झाला?

स्वातंत्र्यापूर्वी 1868 मध्ये एक व्यापारी संस्था म्हणून टाटा समूहाचा प्रवास सुरू झाला आणि आता केवळ देशातच नाही जगातील एक मोठं नावं आहे. लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांसह सुमारे 100 हून अधिक कंपन्या व्यवसाय करत आहेत. टाटाचं साम्राज्य इतकं मोठं आहे की 6 खंडांमधील 100 हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहेत, तर 150 हून अधिक देशांमध्ये उत्पादने आहेत.

केवळ एका कंपनी ६ लाखांहून अधिक कर्मचारी

देशाला पहिलं लक्झरी हॉटेल, पहिली एअरलाइन किंवा पहिली स्वदेशी ग्राहकोपयोगी वस्तू देणाऱ्या टाटा समूहाच्या कमाईबद्दल बोलायचंचं झालं तर 2023-24 या आर्थिक वर्षात 165 अब्ज डॉलर इतकी होती. तर जगभरात टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 1,028,000 वर पोहोचली आहे. टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे, या एका कंपनीत 6,14,795 कर्मचारी काम करतात.

जमशेदजी टाटा यांनी उभारलेले हे प्रचंड व्यापारी साम्राज्य रतन टाटा यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. 1991 मध्ये टाटा समूहाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रतन टाटा यांनी टाटांची भूमिका प्रदीर्घकाळ त्यांनी जगभर पोहोचवली अनेक फायदेशीर करार केले. यानंतर त्यांनी 2012 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि दिवंगत सायरस मिस्त्री यांच्याकडे कमान सोपवली, मात्र कंपनीतील व्यवस्थापकीय प्रश्न उद्भवल्यामुळे मिस्त्री यांना बोर्डातून काढून टाकण्यात आलं आणि 2016 मध्ये टाटांनी पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारली. मात्र 2017 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली आणि ही जबाबदारी नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे सोपवली. मात्र, रतन टाटा ट्रस्टची जबाबदारी सांभाळत आहेत.

Tata Company Real Owner
State Revenue Sources : राज्यांकडे पैसा येतो तरी कुठून? तिजोरी रिकामी झाली की कर्मचाऱ्यांना पगारही मिळणं होतं मुश्किल

टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा किती टक्के हिस्सा?

टाटा समूहात टाटा सन्स मुख्य प्रवर्तक आणि गुंतवणूकदार आहे. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची 66 टक्के भागीदारी आहे, जी शिक्षण, आरोग्य, कला, संस्कृती यासारख्या क्षेत्रात काम करते. रतन टाटा यांनी राजीनामा दिल्यानंतर चेअरमन एन चंद्रशेखरन समूहचं कामकाज पाहात आहेत, परंतु चंद्रशेखरन यांच्याशिवाय टाटा ट्रस्टचा मोठा हिस्सा असल्यामुळे कंपन्यांसाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात रतन टाटा यांची भूमिका असते. टाटा समूहाच्या कंपन्या किंवा व्यवसाय त्यांच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली स्वतंत्रपणे चालवले जातात.

टाटांच्या नव्या पिढीची एन्ट्री

रतन टाटा यांच्याशिवाय टाटा ट्रस्टमध्ये विजय सिंग आणि मेहली मिस्त्री यांच्यासह अन्य विश्वस्त आहेत. त्याचबरोबर टाटा कुटुंबातील नव्या पिढीनेही समूहात प्रवेश केला आहे. टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्डात रतन टाटा यांचे भाऊ नोएल टाटा यांच्या तीन मुलांचा समावेश केला आहे. यामध्ये लेआ (लेह टाटा), माया (माया टाटा) आणि नेव्हिल (नेव्हिल टाटा) यांच्या नावांचा समावेश आहे. इतकंच नाही तर रतन टाटा यांचे लहान भाऊ जिमी टाटा देखील १३२ वर्षे जुन्या टाटा ट्रस्टमध्ये जबाबदारी सांभाळत आहेत.

Tata Company Real Owner
Explainer : कांद्याच्या आयात-निर्यातीत नाफेडची भूमिका काय, भाव कसा ठरवला जातो? शेतकऱ्यांना खरंच फायदा होतो का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com