Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकारकडून मोठा बदल, कुणाला अन् किती मिळणार फायदा? जाणून घ्या

Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. आता ७० वर्षांवरील नागरिकांनाही या योजनेअंतर्गत ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
Ayushman Bharat Yojana
Ayushman Bharat YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारची अशीच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत. आयुष्मान भारत योजनेत सरकार नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात.आयुष्मान भारत योजनेत महिलांना मोफत उपचार दिले जाते.

गरीब लोकांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. यासाठी आयुष्मान कार्ड बनवून घ्यावे लागते. या योजनेत आता ७० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही मोफत उपचार मिळणार आहे.

याआधी फक्त ७० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील उमेदवारांना आयुष्मान भारत कार्ड दिले जात होते. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. आयुष्मान भारत योजना नक्की काय आहे? या योजनेचा नागरिकांना काय फायदा होतो? याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

पात्रता

२०११ च्या जणगणनेनुसार, ज्या लोकांचा समावेश गरीब गटात होतो. त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत आजारी पडल्यास रुग्णालयात ५ लाखांपर्यंतचा क्लेम करता येतो. त्यामुळे तुमच्या उपचाराचा खर्च हा मोफत होणार आहे.

Ayushman Bharat Yojana
Government Schemes : स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी खिशात पैसे नाहीत? केंद्र सरकारच्या 'या' योजनांची होईल मोठी मदत

योजनेसाठी अर्ज कसा करावा

या योजनेत नागरिकांना आयुष्मान कार्ड दिले जाते. या कार्डवर तुम्हाला ५ लाखांचा मोफत उपचार घेता येतो. यासाठी तुम्हाला pmjay.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर Am I Eligible पर्यायावर क्लिक करावे लागेल. मोबाइल नंबर टाका. त्यानंतर ओटीपी टाकावा लागेल. यानंतर तुमचे राज्य निवडावे लागेल. रेशन कार्ड नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे समजले. यानंतर आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र टाकून तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे.

Ayushman Bharat Yojana
Government Scheme: खुशखबर! महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मिळणार इतके पैसे; नोव्हेंबरपर्यंत करु शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com