World Test Championship 2025 Final Scenario: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची समीकरणं बदलायला सुरुवात झाली आहे. येत्या काही महिन्यात या स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये रंगणार आहे. कोणते २ संघ या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करणार ? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान फायनलमध्ये जाण्यासाठीचं समीकरण शेअर केलं आहे. काय आहे समीकरण? जाणून घ्या.
भारतीय संघाने आपलं अव्वल स्थान राखून ठेवलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघ अव्वल स्थानी कायम आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत भारतीय संघाने जर २-० ने विजय मिळवला, तर भारतीय संघाचं फायनलचं तिकीट जवळजवळ कन्फर्म होऊन जाईल.
इथून पुढे भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिका जिंकून भारतीय संघ ८५.०९ पर्यंत पोहचू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला अन् मायदेशातील मालिका जिंकल्या तरीदेखील भारतीय संघ ७९.७६ पर्यंत पोहचू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या वर्षीचा गतविजेता संघ आहे. मात्र यावेळी ऑस्ट्रेलियासाठी फायनल गाठणं मुळीच सोपं नसेल. कारण भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी येणार आहे. गेल्या १० वर्षात ऑस्ट्रेलियाला एकही बॉर्डर गावसकर मालिका जिंकता आलेली नाही. भारताविरुद्ध खेळताना ५ आणि श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी जिंकले तर ऑस्ट्रेलियाचा संघ ७६.३२ पर्यंत पोहचू शकतो. हे फायनलमध्ये जाण्यासाठी पुरेसे आहेत.
न्यूझीलंडला फायनलमध्ये जाण्याची सर्वाधिक संधी आहे. कारण येत्या काही दिवसांत न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध ३, श्रीलंकेविरुद्ध २,त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ३ कसोटी सामने खेळणार आहे. हे सामने जिंकले तर न्यूझीलंडचा संघ ७८.५७ सरासरीसह फायनलमध्ये प्रवेश करू शकतो.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला यावेळी तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. स्पर्धेतील पहिल्या दोन्ही हंगामामध्ये भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. पहिल्या फायनलमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून तर दुसऱ्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.