WTC Points Table: पाकिस्तानला लोळवत बांगलादेशची TOP-4 मध्ये धडक! या 2 संघांचं टेन्शन वाढलं

WTC Points Table After PAK vs BAN Test Series: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला २-० ने पराभव पत्कारावा लागला आहे. या मालिकेनंतर WTC चं समीकरण बदललं आहे.
WTC Points Table: पाकिस्तानला लोळवत बांगलादेशची TOP-4 मध्ये धडक! या 2  संघांचं टेन्शन वाढलं
bangladesh cricket team twitter
Published On

Latest WTC Points Table Update: पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह पाकिस्तानला कसोटी मालिका २-० ने गमवावी लागली आहे.

या विजयाचा बांगलादेश संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. बांगलादेशने टॉप ४ मध्ये प्रवेश केला आहे. तर भारतीय संघ अजूनही अव्वल स्थानी कायम आहे.

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत बांगलादेशने शानदार कामगिरी करुन दाखवली आहे. आतापर्यंत बांगलादेशने ५ सामने खेळले असून, २ सामने जिंकले आहेत. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हे दोन्ही सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानची विजयाची सरासरी ४५.८३ वर जाऊन पोहोचली आहे. तर ४५ टक्के विजयाची सरासरी असलेला इंग्लंडचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी सरकला आहे. बांगलादेशच्या विजयामुळे इंग्लंडचं टेन्शनही वाढलं आहे.

WTC Points Table: पाकिस्तानला लोळवत बांगलादेशची TOP-4 मध्ये धडक! या 2  संघांचं टेन्शन वाढलं
WTC Points Table: इंग्लंडच्या विजयाचा या संघाला झाला फायदा! टीम इंडियाचं टेन्शन वाढलं?

भारतीय संघ अव्वल स्थानी कायम

भारतीय संघ ६८.५२ टक्के विजयाच्या सरासरीसह अव्वल स्थानी कायम आहे. भारताने सुरुवातीपासून आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. ६२.५० टक्के विजयाची सरासरी असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर ५० टक्के विजयाच्या सरासरीसह न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

आता पाकिस्तानला हरवत बांगलादेश संघाने मोठी झेप घेतली आहे. बांगलादेशचा संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर ४५ टक्के विजयाच्या सरासरीसह इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानी आहे. ३८.८९ टक्के विजयाच्या सरासरीसह दक्षिण आफ्रिकेचा संघ सहाव्या स्थानी आहे.

WTC Points Table: पाकिस्तानला लोळवत बांगलादेशची TOP-4 मध्ये धडक! या 2  संघांचं टेन्शन वाढलं
Team India : आगामी सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे जखमी

सातव्या स्थानी असलेल्या श्रीलंकेची विजयाची सरासरी ३३.३३ इतकी आहे. सलग पराभवांनंतर पाकिस्तानचा संघ आठव्या स्थानी सरकला आहे. पाकिस्तानची विजयाची सरासरी २२.२२ इतकीच आहे. १८.५२ टक्के विजयाच्या सरासरीसह वेस्टइंडीजचा संघ सर्वात शेवटी आहे.

भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघाने यापूर्वी २ वेळेस या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यावेळीही भारतीय संघा गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com