WTC Points Table: इंग्लंडच्या विजयाचा या संघाला झाला फायदा! टीम इंडियाचं टेन्शन वाढलं?

WTC News In Marathi: श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
WTC Points Table: इंग्लंडच्या विजयाचा या संघाला झाला फायदा! टीम इंडियाचं टेन्शन वाढलं?
england cricket teamtwitter
Published On

इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार पार पडला. लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने शानदार खेळ करत १९० धावांनी विजय मिळवला आहे.

या विजयासह इंग्लंडने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या शानदार कामगिरीचा इंग्लंडला फार काही फायदा झालेला नाही. तर दुसरीकडे पराभूत झालेल्या इंग्लंड संघाला मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

WTC Points Table: इंग्लंडच्या विजयाचा या संघाला झाला फायदा! टीम इंडियाचं टेन्शन वाढलं?
Joe Root Record: सचिनचा कसोटीतील महारेकॉर्ड धोक्यात! जो रुट इतिहास रचण्यापासून अवघ्या इतक्या धावा दुर

इंग्लंडच्या विजयाचा बांगलादेशला फायदा

इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत घसरण झाली आहे. सहाव्या स्थानी असलेला श्रीलंकेचा संघ सातव्या स्थानी सरकला आहे. श्रीलंकेची या स्पर्धेतील कामगिरी पाहीली, तर या संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत.

तर उर्वरीत चारही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेच्या पराभवाचा बांगलादेशला फायदा झाला आहे. श्रीलंकेचा संघ खाली सरकल्यानंतर बांगलादेशचा सातव्या स्थानावरुन सहाव्या स्थानी पोहोचला आहे. बांगलादेशलाही या स्पर्धेत २ सामने जिंकता आले आहेत.

भारतीय संघ अव्वल स्थानी

इंग्लंडच्या विजयाचा भारतीय संघावर कुठलाही परिणाम झालेला नाही. इंग्लंडच्या या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या संघाने आतापर्यंत १५ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला ८ सामने जिंकता आले आहेत.

तर ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला ६ सामने जिंकता आले आहेत.

भारतीय संघ तिसऱ्यांदा फायनल खेळणार?

भारतीय संघाला यावेळीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने २ वेळेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१९-२१ मध्ये झालेल्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यानंतर २०२१-२३ या दरम्यान झालेल्या स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातही भारतीय संघाचा पराभव झाला होता. दरम्यान भारतीय संघाकडे तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com