सध्या टीम इंडियाचे खेळाडू आराम करतायत. भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये 19 सप्टेंबरपासून टेस्ट सीरीजला सुरुवात होणार आहे. अशातच टीमचे काही खेळाडू इतर टूर्नामेंट्समध्ये खेळतायत. यामध्येच आता टीम इंडियासाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. टूर्नामेंटमध्ये खेळत असताना टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जातोय.
टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव सध्या बुची बाबू टूर्नामेंट खेळत असून तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. सूर्या दुखापतीमुळे फलंदाजीला आला नव्हता. या सामन्यात तामिळनाडू टीमने मुंबईचा 286 रन्सने पराभव केला. यावेळी तामिळनाडूने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
या सामन्यामध्ये तामिळनाडूने मुंबईला ५१० रन्सचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची टीम चौथ्या दिवशी २२३ रन्सवर गारद झाली. यावेळी मुंबईकडून शम्स मुलानीने ६८ रन्सची खेळी केली. तामिळनाडू टीमकडून सीए अच्युत आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी विकेट्स घेतले.
या सामन्यामध्ये भारताचा T20 कर्णधार सूर्यकुमार हाताला दुखापत झाली आणि यामुळे तो फलंदाजी करू शकला नाही. दरम्यान तपासणीनंतर दुखापत गंभीर नसल्याचं दिसून आलं. सामन्यानंतर सूर्यकुमार यादव बरा झाल्याचं दिसून आला. खबरदारी म्हणून सूर्याने विश्रांती घेत फलंदाजीला न उतरण्याचा निर्णय घेतला होता.
या सामन्यात सूर्यकुमार सरफराज खानच्या नेतृत्वाखाली खेळत होता. तामिळनाडूविरूद्ध मुंबईची टीम फिल्डींग करत असताना सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाली. दरम्यान ही दुखापत कितपत गंभीर आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात सुरु होणाऱ्या दुलिप ट्रॉफीमध्ये सूर्या खेळणार का हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सूर्याकुमार यादवच्या म्हणण्यानुसार, त्याला भारताच्या टेस्ट टीममध्ये स्थान मिळवायचं आहे. टेस्ट टीममध्ये जागा मिळवण्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेट खेळणार असल्याचं, त्याने यापूर्वी सांगितलं होतं. सूर्यकुमार म्हणाला होता की, मलाही देखील टेस्ट टीममध्ये स्थान मिळवायचं आहे. जेव्हा मी भारतासाठी टेस्ट टीममध्ये डेब्यू केला तेव्हा मी दुखापतीमुळे बाहेर पडलो. ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यांनी चांगली कामगिरी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.