PAK vs BAN: पाकिस्तानचं काय चुकतेय? घरच्याच मैदानावर बांगलादेशने लोळवलं, पाहा दारुण पराभवाची कारणं!

Reasons Behind Pakistan Defeat: पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत पाकिस्तानला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान काय आहेत पराभवाची कारणं?
PAK vs BAN: पाकिस्तानचं काय चुकतेय? घरच्याच मैदानावर बांगलादेशने लोळवलं, पाहा दारुण पराभवाची कारणं!
pakistan cricket team
Published On

Reasons Behind Pakistan Defeat In PAK vs BAN Series: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याची स्वप्न पाहत असलेल्या पाकिस्तानला बांगलादेशने चांगलाच धक्का दिलाय. परदेशात पराभूत होणं हे एखाद्या वेळी समजू शकतो. पण पाकिस्तानला आपल्याच होमग्राऊंडवर, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताकडून नव्हे तर बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागलाय.

पाकिस्तान संघाला याचा जबर धक्का बसलाच असेल, कारण कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने यापूर्वी कधीच पाकिस्तानला हरवलं नव्हतं. यावेळी दोन्ही सामने जिंकून बांगलादेशने इतिहास रचला आहे. दरम्यान काय आहेत लाजिरवाण्या पराभवाची कारणं? जाणून घ्या.

फ्लॉप फलंदाजी

कसोटी सामना जर जिंकायचा असेल, तर संघातील प्रमुख फलंदाजांनी खेळपट्टीवर टीचून फलंदाजी करणं अतिशय महत्वाचं आहे. मात्र होम ग्राऊंडवर खेळत असलेले पाकिस्तानचे फलंदाज ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या खेळपट्टीवर खेळत असल्यासारखं दिसून आलं.

मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिला डाव वगळला, तर इतर कुठल्याही डावात पाकिस्तानी फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात मोहम्मद रिजवानने १७१ धावांची खेळी केली. तर सौद शकीलने १४१ धावांची खेळी केली होती.

या सामन्यात कर्णधार शान मसुदने ६ आणि ११ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात त्याला ५७ आणि २८ धावा करता आल्या. बाबर आझम बद्दल बोलायचं झालं, तर पहिल्या सामन्यात त्याला ० आणि २२ धावा करता आल्या. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याने ३१आणि ११ धावांची खेळी केली.

PAK vs BAN: पाकिस्तानचं काय चुकतेय? घरच्याच मैदानावर बांगलादेशने लोळवलं, पाहा दारुण पराभवाची कारणं!
Team India News: रहाणे, पुजाराला निवृत्तीशिवाय पर्यायच नाही! हे 2 खेळाडू आहेत प्रबळ दावेदार

संघातील अंतर्गत वाद

ही मालिका सुरु असताना पाकिस्तानी खेळाडूंमध्ये अंतर्गत वाद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांच्यात ड्रेसिंग रुममध्ये वाद झाल्याचं म्हटलं जात होतं.

मात्र या सर्व अफवा असल्याचंही म्हटलं गेलं. तरीही पाकिस्तान संघात अंतर्गत वाद असल्याचं म्हटलं जात आहे. याचाच फटका त्यांना बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत बसला असल्याचं म्हटलं जात आहे.

खराब फिल्डिंग

चांगली फिल्डिंग आणि पाकिस्तान संघाचा ३६ चा आकडा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मात्र पाकिस्तानचे फिल्डर्स कॅचेस सोडण्यात एक्सपर्ट आहेत. या मालिकेतही पाकिस्तानच्या फिल्डर्सने बऱ्याच कॅचेस सोडल्या, याचा त्यांना जबर फटका बसला.

गोलंदाजांचा फ्लॉप शो

पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शाहीन आफ्रिदीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं नव्हतं. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने २ गडी बाद केले होते. दुसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तान संघातील अनुभवी गोलंदाज आहे आणि शान मसूदने त्यालाच प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com