Magnesium deficiency: सतत डोळा फडफडतोय किंवा सूजतोय? चुकूनही इग्नोर करू नका, शरीर देतंय महत्त्वाचा मेसेज

How To Know If You Have Magnesium Deficiency: डोळ्याची पापणी फडफडणं, डार्क सर्कल, चेहऱ्यावर ताण ही मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणं असू शकतात. तज्ज्ञांकडून महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
Magnesium deficiency
Magnesium deficiencySAAM TV
Published On

मॅग्नेशियम हे आपल्या शरीरासाठी गरजेचं असलेलं एक मिनरल आहे. मॅग्नेशियम स्नायूंचं कार्य, मज्जातंतूंचे संकेत, हृदयाचे ठोके आणि त्वचेचं आरोग्य राखण्यास मदत करते. ज्यावेळी शरीरात त्याची कमतरता होते तेव्हा चेहऱ्यावर आणि डोळ्यांभोवती काही सौम्य लक्षणं दिसू शकतात.

परंतु चेहऱ्यावरील बदल हे नेहमीच मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षण नसतात. अपुरी झोप, ताण, ऍलर्जी किंवा दैनंदिन दिनचर्येत बदल हे देखील कारणीभूत घटक असू शकतात. मात्र जीवनशैलीत बदल केल्यानंतर समस्या कायम राहिल्यास तुम्ही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

डॉक्टर काय म्हणतात?

एका वेबसाईटला माहिती देताना डॉ. मोहित शर्मा यांनी सांगितलं की, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अनेकदा गंभीर लक्षणं उद्भवत नाहीत. मॅग्नेशियम हे नसा आणि स्नायूंचं संतुलन, झोप, चयापचय क्रिया आणि पेशी दुरुस्ती करत असतं. ज्यावेळी याची कमतरता निर्माण होते तेव्हा शरीर सुरुवातीला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतं. म्हणून सुरुवातीची लक्षणं रूग्णाला समजत नाहीत. ही लक्षणं काय आहे ती पाहूयात.

Magnesium deficiency
Heart blockages warning signs: हार्ट ब्लॉकेज आहेत, आधीच मिळतात हे ५ संकेत; अजिबात दुर्लक्ष करू नका

डोळ्याची पापणी फडफडणं

पापण्या फडफडणं ही एक सामान्य तक्रार आहे. थकवा, जास्त स्क्रीन टाईम, कॅफिन किंवा ताण यामुळे देखील पापणी फडफडू लागते. मॅग्नेशियम हे नसा आणि स्नायूंमधील संतुलन राखतं. त्यामुळे याच्या कमतरतेमुळे मज्जातंतूंवर परिणाम होतो, ज्यामुळे वारंवार पापण्या फडफडतात.

डार्क सर्कल

डोळ्यांखाली डार्क सर्कल आणि सूज येणं हे विविध कारणांमुळे होऊ शकतं. झोपेचा अभाव, ऍलर्जी किंवा लोहाची कमतरता ही सामान्य कारणं आहेत. मॅग्नेशियम झोप सुधारण्यास मदत करतं. याच्या कमतरतेमुळे तुमचा चेहरा थकलेला, निस्तेज किंवा सुजलेला वाटू शकतो.

Magnesium deficiency
Mobile Addiction: जेवताना रिल्स बघणं पडेल महागात, आत्ताच सोडा ही सवय; तज्ज्ञांनी दिला ईशारा

इतर दिसून येणारी लक्षणं

  • जबड्यात घट्टपणा जाणवणं

  • चेहऱ्यावर ताण येणं

  • हात किंवा पाय थरथरणं

  • वारंवार डोकेदुखी

Magnesium deficiency
Spine health tips: बसण्याची-उभं राहण्याची चुकीची पद्धत ठरते धोकादायक; दुखापत टाळण्यासाठी डॉक्टरांनी दिल्यात टीप्स

डॉक्टरांच्या मते, मॅग्नेशियमची टेस्ट करणं सोपं नाही. एक साधी टेस्ट नेहमीच स्पष्ट चित्र दाखवत नाही. म्हणून लक्षणं, आहार आणि रिस्क फॅक्टरवर यांच्यावर भर दिला पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, काजू, बिया, संपूर्ण धान्य आणि कडधान्ये हे चांगले स्रोत असल्याने त्यांचा आहारात समावेश करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com