शेअर मार्केटकडे रोज सर्व गुंतवणदारांचे लक्ष असते.रोज शेअर मार्केटमध्ये चढ-उतार होत असते. हिडनबर्गच्या रिपोर्टनंतर, अदानी कंपनीचे शेअर्स घरसले होते. दोन दिवस शेअर मार्केटमध्ये मंदी होती. आज सकाळी शेअर मार्केट सुरु होताच शेअर्सने चांगलीच उसळी मारली आहे. आज सकाळी शेअर मार्केट (Share Market) ७९.०६५.२२ अंकावर उघडला.
सकाळी शेअर मार्केट खुलताच सेनसेक्स (Sensex) वाढला होता. सकाळी ९.५० वाजेपर्यंत सेनेक्स ७८८९५ अंकावर आला होता. सध्या सेनसेक्स १४५ वाढून ७९१०१ अंकावर व्यव्हार करत आहे. निफ्टी (Nifty) २४२८४ वर उघडला होता. ९.५० वाजेपर्यंत निफ्टी २४०९९ अंकांवर व्यव्हार करत होता.आता निफ्टी २४१६९ अंकावर व्यापार करत आहे.
आज सकाळी शेअर बाजारात Hero MotoCorpचा शेअर्स ३.६५ टक्क्यांनी घसरला आहे.तर TCS चा शेअर्स २.५१ टक्क्यांनी घसरला आहे. अल्ट्राटेक (Ultratech) कंपनीचे शेअर्स १.६१ टक्क्यांनी घसरले आहे तर अदानी पोर्ट्सचे (Adani Ports) शेअर्स ०.८९ टक्क्यांनी घसरला आहे. ही आकडेवारी सकाळी ९.५० वाजताची आहे.
भारतीय शेअर मार्केटमध्ये हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर उलथापालथ झाली होती. सोमवारी शेअर मार्केट सुरु होताच घसण दिसून आली. अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.