नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात सोमवारी अमेरिकी शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गच्या रिपोर्टचा परिणाम पाहायला मिळाला. हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर बाजारात उलथापालथ पाहायला मिळाली. काल शेअर बाजार सुरु होताच तेजी पाहायला मिळाली. त्यानंतर बाजार बंद होता होता घसरण दिसून आली. हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे उद्योजक गौतम अदानींच्या कंपनीचे शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आज मंगळवारी शेअर बाजारात वेगळं चित्र दिसून आलं. आज मंगळवारी अदानी समूहाच्या सर्व कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सेन्सेक्स-निफ्टीची सुरुवात चांगली झाली नाही. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअरवाला सेन्सेक्स ५५.४२ अंकांनी घसरून ७९,५९३.५० पोहोचला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी अवघ्या ०.७० अंकांनी घसरला. त्यानंतर निफ्टी २४,३४६.३० अंकावर स्थिरावलं. शेअर बाजार सुरु झाल्यावर १७११ शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर ६९३ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.
हिंडनबर्ग रिसर्चने नवा रिपोर्ट जारी केला. या रिपोर्टमध्ये बाजारावर नियंत्रण करणाऱ्या सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच या आरोपात गौतम अदानी यांच्या नावाचाही उल्लेख केला होता. त्यानंतर सोमवारी अदानींच्या स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. बाजार बंद होताच शेअर्स ग्रीन झोनमध्ये बंद झाले होते. आज मंगळवारी गौतम अदानींच्या नेतृत्वातील लिस्टेड कंपन्यांचे शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.
अदानी समूहाच्या अदानी एनर्जी सॉल्यूशनमध्ये ४.१२ टक्क्यांची तेजी दिसली. अदानी एंटरप्राइजेजच्या शेअर्समध्ये ०.६० टक्क्यांनी वाढ दिसून आली. अदानी पोर्ट्स शेअर ०.५८ टक्क्यांनी वधारला. तर Adani wilmar च्या शेअर्समध्ये १.५१ टक्क्यांनी वाढ दिसली. तर अदानी ग्रीन १.५८ टक्क्यांनी वधारला. अदानी टोटल गॅश २.४५ टक्क्यांनी वधारला. अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये १.३७ टक्क्यांनी उसळली घेतली. अंबुजा सिमेंटमध्ये ०.०७१ टक्क्यांनी वधारला. एसीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये १.३९ टक्क्यांनी वधारला. एनडीटीव्हीचा शेअर्स २.०७ टक्क्यांनी वधारला.
हिंद कॉपर, एनएमडीसी, व्होडाफोन आयडिया, सेन्को गोल्ड, HUDCO , टिळकनगर इंडस्ट्री, सिग्नेचर ग्लोबल , ONGC,Sugar stocks in focus , MSCI या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.