Share Market: अमेरिकेत मंदी,भारतात ब्लॅक मंडे; गुंतवणूकदारांचे लाखो कोटी पाण्यात

Share Market: अमेरिकेतील मंदीच्या भीतीने सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी पाण्यात गेले. पण शेअर मार्केटमधील ब्लॅक मंडेचं कारण काय? तसंच मार्केटमधील घसरण किती दिवस राहणार? यावरचा हा खास रिपोर्ट.
Share Market: अमेरिकेत मंदी,भारतात ब्लॅक मंडे; गुंतवणूकदारांचे लाखो कोटी पाण्यात
Share Market:
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झालेत. तर सेन्सेक्स तब्बल 2 हजार 222 अंकांनी तर निफ्टी 662 अंकांनी आपटलीय. तर त्यामुळे सोमवार गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक मंडे ठरलाय....पण या ब्लॅक मंडेची कारणं काय आहेत पाहूयात.

ब्लॅक मंडेची कारणं?

अमेरिकेतील फेडरल बँकेने जाहीर केलेला बेरोजगारीचा दर आणि मंदीची भीती

जपानच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ केल्याने डॉलरच्या तुलनेत जपानी चलनाचं मूल्य वाढलं

इराण-इस्त्राईलमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती

अनेक कंपन्यांचे तिमाही अहवाल नकारात्मक

अमेरिकेच्या फेडरल बँकेचा अंदाज, त्यानंतर शुक्रवारी भारतीय गुंतवणूकदारांनी मार्केटमधून काढून घेतलेले पैसे तसंच ब्लॅक मंडेच्या चर्चेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यामुळे सोमवारी शेअर मार्केट गडगडलं. तरीही जागतिक मंदीचा भारतीय शेअर बाजारावर जास्त परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचं सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी सांगितलंय.

केंद्रीय अर्थसंकल्पातून गुंतवणूकदारांची निराशा झाली होती. त्यातच मंदीच्या सावटामुळे गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधून पैसे काढून घेण्याला प्राधान्य दिलं. मात्र मार्केट स्थिर ठेवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना धीर देण्यासाठी सरकार काय धोरणात्मक पावलं उचलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Share Market: अमेरिकेत मंदी,भारतात ब्लॅक मंडे; गुंतवणूकदारांचे लाखो कोटी पाण्यात
Share Market Crash : शेअर बाजारात उलथापालथ; अमेरिकेतील मंदीच्या धसक्याने सेन्सेक्ससह निफ्टीची घसरगुंडी, कोणते शेअर्स घसरले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com