शेअर बाजारात गेल्या आठवड्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील लिस्टेड टॉप-१० कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर दुसरीकडे तीन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. यात मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे. (Latest Marathi News)
रिपोर्टनुसार, देशातल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात ५०००० कोटींची कमाई केली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, रिलायन्सचं मार्केट कॅपिटलायजेशन ४७,०२१.५९ इतके रुपयांनी वाढली आहे. यानंतर कंपनीचं मुल्य वाढून १७,३५,१९४.८५ रुपये होणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यतिरिक्त दोन कंपन्यांनाही बाजारात नफा झाला आहे. या दोन कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि प्रायव्हेट सेक्टरमधील एचडीएफसी बँकेचा सामावेश आहे.
HUL कंपनीची मार्केटकॅप १२,२४१.३७ कोटी नफ्यासहित वाढून ६,०५,०४३.२५ कोटी रुपयांवर पोहोचली. तर एचडीएफसी बँक मार्केट कॅप ११, ०४९.७४ कोटी रुपयांनी वाढून १२,६८,१४३.२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात सेन्सेक्स तेजीत दिसलं. त्याचबरोबर एकदा ३७६.७९ अंकानी घसरल्याचंही दिसून आलं. तर गेल्या आठवड्यात बाजार मूल्याचा विचार केला तर देशातील टॉप-१० कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज टॉपमध्ये होती.
त्यानंतर क्रमश: टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारतीय स्टेट बँक, आयटीसी, एयरटेल आणि एलआयसी या कंपन्या होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.