नवीन वर्षाला सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. लवकरच आपण सर्वजण साल २०२४ चं स्वागत करणार आहोत. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जल्लोषाची तयारी सुरू आहे. अशात डिसेंबर महिना संपण्याआधी आपली काही महत्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. ही कामे अर्धवट राहिली तर यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे कठीण होईल
जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. शेअर मार्केटमधील प्रत्येक गुंतवणुकदाराने ३१ डिसेंबर पूर्वी नॉमिनीचे नाव जोडावे. कारण सेबीने डिमॅट खात्यात नॉमिनेचे नाव जोडण्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल तरी देखील नॉमिनीचे नाव जोडणे गरजेचे आहे. जर तुम्ही नॉमिनीचे नाव जोडले नाही तर तुम्हाला पैसे जमा करणे तसेच काढणे यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.
इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंग
इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आयकर विभागाकडून ३१ जुलै ही शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र अनेकांनी शेवटची तारीख उलटूनही पैसे भरले नाहीत. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत वाढवण्यात आलीये. वाढवलेली मुदत संपण्याआधी तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. अन्यथा पुढल्या वर्षी यासाठी तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो.
बँक लॉकर अॅग्रिमेंट
आपल्या ग्राहकांचे लॉकर अॅग्रिमेंट सुधारीत करण्याच्या सूचना भारतीय रिजर्व बँकेने सर्व बँकांना दिल्यात. यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत हे पूर्ण न झाल्यास तुमचे बँक लॉकर रिकामे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक लॉकर अॅग्रिमेंट लवकरच पूर्ण करणे गरजेचं आहे.
UPI ID बंद होणार
नॅश्नल पेमेंट्स कारपोरेशन ऑफ इंडियाने पेटीएम, गूगल पे, फोन पे अशा ऑनलाइन पेमेंटसाठी UPI आयडी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. जर तुमच्याकडेही गेल्या एक वर्षापासून न वापरलेलं UPI आयडी असेल तर ते लवकरच बंद पडेल. त्यामुळे तुमच्याकडे असा UPI आयडी असेल तर तो ३१ डिसेंबर आधी बदलून घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.