Bihar Crime News
Bihar Crime NewsSAAM DIGITAL

Bihar Crime: शेतात भाजीची पाने तोडताना सापडली, बाप लेकाने केलेल्या मारहाणीत १४ वर्षीय मुलीचा मृत्यू; संतापजनक घटना

Crime News: बाप लेकांनी मिळून मुलीला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुंदरी कुमारीचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाला.
Published on

Bihar Crime News:

शेतातील हरभऱ्याच्या भाजीची पाने तोडल्याच्या रागातून १४ वर्षीय मुलीला काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारच्या पटनामध्ये घडला. या बेदम मारहाणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत. (Crime News in Marathi)

समोर आलेल्या माहितीनुसार, चैनपूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या हाता गावातील जितेंद्र राम यांची मुलगी सुंदरी कुमारी (१४) तिच्या चुलत भावासोबत बुधवारी (२० डिसेंबर) शेजारच्या गावातील एका शेतात भाजी काढण्यासाठी गेली होती. यावेळी तिला शेतमालक रामधर यादव आणि त्यांचा मुलगा गौरव यादव या दोघांनी हरभऱ्याच्या भाजीची पाने खुडताना पाहिले.

यावेळी बाप लेकांनी मिळून मुलीला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुंदरी कुमारीचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मुलीचे वडिल जितेंद्र राम यांनी चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bihar Crime News
Chetak Festival 2023: पांढरा शुभ्र रंग, देशातील सर्वात उंच घोडी... बरेलीची राधा 'चेतक फेस्टिवलचे' मुख्य आकर्षण; किंमत ऐकून व्हाल अवाक

याप्रकरणी बोलताना चैनपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ शंभू कुमार यांनी "आम्ही आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना केल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या घटनेनंतर कैमूरचे जिल्हा सचिव विजय यादव यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय-एमएलच्या पाच सदस्यीय पथकाने पिडीतेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबियांनी आरोपींना तात्काळ अटक करावी आणि 20 लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली. (Latest Marathi News)

Bihar Crime News
Sanjay Raut News: '...तर आम्हाला देशाच्याही बाहेर काढतील; संजय राऊतांचा मोदी- शहांवर घणाघात, राम मंदिर उद्घाटनावरुन टीकास्त्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com