Pune Crime: PMPLला कार आडवी लावली, मद्यपी तरुणांकडून चालकाला बेदम मारहाण; पुण्यातील संतापजनक घटना

Pune latest News: या मारहाण प्रकरणी वेल्हे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. तर त्याचा दुसरा साथिदार फरार आहे.
Pune Crime News
Pune Crime News Saam Digital
Published On

सचिन जाधव, पुणे|ता. २२ डिसेंबर २०२३

Pune Crime News:

पीएमपीएमएल चालकाला रस्त्यावरून जाणाऱ्या काही मद्यपी तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील आंबवणे परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. मारहाणीत पीएमपीएमएल चालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. (Crime News in Marathi)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२०, डिसेंबर) पीएमपीएल बस ही विंझर गावाकडून पुण्याच्या (Pune) दिशेने निघाली होती. यावेळी आंबवणे परिसरात काही मद्यपी तरुणांनी गाडी आडवी मारण्याचा प्रयत्न केला. तसेच संबंधित पीएमपीएल चालकाला बेदम मारहाण केली.

या घटनेत चालक तेजस चंद्रकात गायकवाड जखमी झाले असून त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. तर त्याचा दुसरा साथिदार फरार आहे. निलेश पंढरीनाथ सरपाले (वय २६) असं अटक केलेल्याचे नाव असून श्रेयस काळूराम सरपाले हा फरार झाला आहे.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime News
Chetak Festival 2023: पांढरा शुभ्र रंग, देशातील सर्वात उंच घोडी... बरेलीची राधा 'चेतक फेस्टिवलचे' मुख्य आकर्षण; किंमत ऐकून व्हाल अवाक

बहिणीला त्रास देणाऱ्या भावजीची हत्या...

बहिणीला त्रास देणाऱ्या भावजीची मित्रांच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील बालेवाडी परिसरातील पाटील वस्तीत घडली. राजेंद्र कुमार कांबळे (वय २४, रा. बालेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Police) बाब्या व राहुल रिकामे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Pune Crime News
Yavatmal News : शेतक-यांसाठी आनंदाची बातमी; नाफेडने सुरु केली तूर खरेदी केंद्र; जाणून घ्या प्रक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com