Satara Crime News: दुकान बंद करून माय-लेकी घरात झोपी गेल्या; सकाळी शेजाऱ्यांनी दरवाजा उघडताच दृश्य बघून हातपाय लटपटले

Satara Crime News: सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वृध्द आईसोबत झोपी गेलेल्या लेकीचा आणि तिच्या आईचा अज्ञातांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे.
Satara Crime News
Satara Crime NewsSaam Digital
Published On

Satara Crime News

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वृध्द आईसोबत झोपी गेलेल्या लेकीचा आणि तिच्या आईचा अज्ञातांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. संपदाबाई लक्ष्मण नरळे (वय 75 ) आणि त्यांची मुलगी नंदाबाई भिकू आटपाडकर (वय 58 ) अशी मृतांची नावे आहेत.

संपदाबाई आणि त्यांची मुलगी नंदाबाई पर्यंती येथील ग्रामपंचायत कार्यालयानजीकच्या घरात राहात होत्या. घरातच छोट्याशा किराणा मालाच्या दुकानावर त्यांची गुजरान होत होती. दरम्यान आज सकाळी उशीरापर्यंत दुकान व घराचे दरवाजे बंद होते. त्यामुळे ग्रामस्थांनी घराचा बाहेरील दरवाजा खटखटून त्यांना हाका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. बराच उशीर झाल्यामुळे नाईलाजास्तव ग्रामस्थांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. समोरचं दृष्य पाहून ग्रामस्थही हादरून गेले. दोघी मायलेकी निपचित पडल्या होत्या. त्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Satara Crime News
Thane Crime: दीराकडे राहायला आली होती पत्नी आणि २ मुलं; भेटायला आलेल्या क्रूर पतीनं तिघांनाही संपवलं

माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतले. दोघींचाही गळा आवळून खून केल्याचं तपासात उघड झालं आहे. दरम्यान या वृद्ध महिलांचा का आणि कशासाठी केला याचा अद्याप खुलासा झाला नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. माय लेकीची अशी निर्घूण हत्या करण्यात आल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Satara Crime News
Pune Crime News: पुणे हादरलं! अल्पवयीन कर्णबधीर मुलीवर तिचा भाऊ आणि मित्रांकडून वारंवार अत्याचार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com