Thane Crime: दीराकडे राहायला आली होती पत्नी आणि २ मुलं; भेटायला आलेल्या क्रूर पतीनं तिघांनाही संपवलं

Thane News : अमित याला दारू पिण्याचे प्रचंड व्यसन असल्या कारणाने भावना ही त्याला सोडून दीर विकास बागडीसोबत काही दिवसांपासून मागील राहत होती.
Thane Crime
Thane CrimeSaam tv

ठाणे : पतीला दारूचे व्यसन असल्याने दोन्ही मुलांना घेऊन महिला आपल्या दिराकडे राहत होती. (Crime News) दरम्यान पत्नी व मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पतीने पत्नीसह तिच्या दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना (Thane) ठाण्यातील कासारवडवली साईनगर येथे उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Thane Crime
Unseasonal Rains : अवकाळी पावसामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर

ठाणे शहरातील कासारवडवली येथे हि घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेत भावना अमित बागडी तसेच खुशी अमित बागडी (वय ६) आणि अंकुश अमित बागडी (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. मृत भावना हिचा पती अमित धर्मवीर बागडी यानेच क्रिकेटच्या बॅटने तिघांची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. (Thane Crime) दरम्यान अमित याला दारू पिण्याचे प्रचंड व्यसन असल्या कारणाने भावना ही त्याला सोडून दीर विकास बागडीसोबत काही दिवसांपासून राहत होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Thane Crime
Jalgaon News : गिरणा नदीच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू; वाळू उपोषणे झालेल्या खड्ड्यामुळे गेला बळी

तीन दिवसांपूर्वी अमित आला मुक्कामी 

पत्नी राहत असलेल्या ठिकाणी तीन दिवसापासून आरोपी अमित हा पत्नी आणि दोन मुले यांना भेटण्यासाठी म्हणून आला होता. दरम्यान आज सकाळी अमितचा भाऊ विकास बागडी हा नेहमीप्रमाणे सात वाजता त्याच्या हाउसकीपिंगच्या कामासाठी गेला. त्यानंतर साधारण साडेअकराच्या सुमारास तो घरी परतला असता त्याला घरात भावना व दोन्ही मुले हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची बॅट दिसून आली. यानंतर पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. 

आरोपी पतीचा शोध सुरु 
आई व दोन मुलांची हत्या झाल्याची माहिती सकाळी कासारवडवली पोलीस ठाण्याला मिळाली. कासारवडवली पोलीस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक टीम कासारवडवली गावात घटनास्थळी पोहोचली आणि तपासाअंती पतीनेच पत्नी व दोन मुलांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केली. सध्या पोलीस कसून तपास करत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल; असे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com