Thane Corona Update: ठाण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला, आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर

Corona in Thane: अनेक राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचदरम्यान, ठाण्यातील कळवा रुग्णालयात कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. यामुळे रुग्णालय प्रशासन सतर्क झालं आहे.
Thane Covid case
Thane Covid case Saam tv
Published On

विकास काटे, ठाणे

Thane Corona Virus Update:

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा लोकांची डोकेदुखी वाढवली आहे. देशात गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे पाचहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या Covid JN.1 या नव्या व्हेरिएंटमुळे देशातील अनेक राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याचदरम्यान, ठाण्यातील कळवा रुग्णालयात कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. यामुळे रुग्णालय प्रशासन सतर्क झालं आहे. (Latest Marahi News)

ठाण्यात पुन्हा कोरोना

कोरोना या महामारी आजारामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविला होता. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हा आजार हद्दपार झाल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला होता. त्यातच मंगळवारी सायंकाळी ठाणे महापालिका हद्दीत एक १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Thane Covid case
Pune News: पुण्यात Vlog करणाऱ्या कोरियन तरुणीचा विनयभंग, फोटा काढताना गळ्यात टाकला हात; नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

तरुणीला कोरोनाची लागण झाल्याने समोर आल्याने रुग्णालयात प्रशासानातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कोरोनाची लागण झालेल्या तरुणीवर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

या तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. या अहवालानंतर कोरोनाचा कोणता व्हेरिएंट आहे, हे स्पष्ट होणार आहे.

Thane Covid case
Santacruz News: सांताक्रुज पोलीस ठाण्याचा स्तुत्य उपक्रम; वृद्धाश्रमातील वृध्दांना घडवली समुद्र सफर

नाशकात झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क

नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्याचं समोर आला आहे. झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. झिका विषाणूचा रुग्ण आढळल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर रुग्ण राहत असलेल्या परिसरात स्क्रिनिंग सुरु केली आहे.

या स्क्रिनिंगदरम्यान, विशेष म्हणजे गरोदर महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. पालिकेकडून आतापर्यंत ३४८० घरांचे सर्व्हे करण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत 15,718 लोकांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com