Pune News: पुण्यात Vlog करणाऱ्या कोरियन तरुणीचा विनयभंग, फोटा काढताना गळ्यात टाकला हात; नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

South korean vlogger girl in pune vlog : 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' मानल्या जाणाऱ्या म्हणजेच पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातही दक्षिण कोरियातील तरुणीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे.
South korean vlogger girl in pune vlog
South korean vlogger girl in pune vlog Saam tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

South korean girl in pune vlog :

मुंबईतील रस्त्यावर एका दक्षिण कोरियातील युट्यूबर तरुणीची छेड काढल्याचा व्हिडिओ गेल्या वर्षी समोर आला होता. त्यानंतर असाच एक प्रकार 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' मानल्या जाणाऱ्या म्हणजेच पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातही दक्षिण कोरियातील तरुणीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. या व्हिडिओतील घटनेवरून नेटकऱ्यांनी छेड काढणाऱ्या तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

1.68 लाख सबस्क्राइबर्स असलेली YouTuber २ महिन्यापूर्वी पुण्यातील रस्त्यांवर फेरफटका मारत होती होती. या शहराची संस्कृती कशी आहे, तसेच या शहरातील नागरिक कसे आहेत, याबद्दल दक्षिण कोरियातील तरुणी व्लॉगच्या माध्यमातून अनेक दुकानदारांशी संवाद साधत होती. तिचा व्हिडिओ सुरू असताना परदेशी तरुणींना पाहून चक्रावलेल्या एका तरुणाने थेट तिच्या गळ्यात हात टाकला. घडलेला हा प्रकार अतिशय लाजिरवाणा आहे, असं म्हणत तिने परिसरातून धाव घेतली.

दक्षिण कोरियातील तरुणीसोबत हा प्रकार नेमका कुठल्या भागात समजू शकले नाही. परंतु हा व्हिडिओ पिंपरी-चिंचवडमधील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण कोरियाहून आलेल्या या YouTuber ने एक २३ मिनिटाचा एक व्हिडिओ तयार केला आहे. तिने हा सगळा प्रकार समोर आणला आहे.

South korean vlogger girl in pune vlog
Manoj jarange Patil: 'विशेष अधिवेशनाची गरज नाही, वेळेत निर्णय न घेतल्यास...' जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

'तुम्ही कुठेही प्रवास करता, तुम्हाला वाईट माणसं भेटू शकतात. हे सर्वत्र आहे. त्यामुळे कृपया प्रत्येक भारतीयाला न्याय देऊ नका. माझ्या अनुभवानुसार, भारत हे राहण्यासाठी खूप चांगले ठिकाण आहे, असं सांगत कोरियन तरुणीने व्हिडिओमध्ये घडलेला हा सगळा प्रकार सांगितला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

South korean vlogger girl in pune vlog
Buldhana News: बुलढाणा बस अपघात: मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत मिळेना; नागरिकांचे अपघातस्थळी अनोखे आंदोलन

कोरियन तरुणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या कोरियन तरुणीचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com