Manoj jarange Patil: 'विशेष अधिवेशनाची गरज नाही, वेळेत निर्णय न घेतल्यास...' जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Maratha Reservation: "अहवाल आला आहे. नोंदीही मिळाल्या आहेत. त्यामुळे दुसरे अधिवेशन बोलावण्यची गरज नाही याच अधिवेशनात कायदा करावा..." असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Saam Tv
Published On

Maratha Reservation :

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघे काही दिवस उरलेत. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी हालचाली सुरू झाल्या असून मराठा- कुणबी नोदींचा अहवालही शिंदे समितीने सरकारकडे सादर केला आहे. २४ डिसेंबरची तारीख जवळ आली असतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान केला. २४ तारखेपर्यंत वेळ दिला. काल त्यांनी शिंदे समितीने अंतिम अहवालही दिला. ज्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितली होती. आता 24 तारखेच्या आत कायदा करा. याच अधिवेशनात चर्चा करुन मराठा आरक्षणासाठी कायदा पारित करावा.." असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तसेच "या निर्णयासाठी दुसरे विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नाही. अहवाल आला आहे. नोंदीही मिळाल्या आहेत. त्यामुळे दुसरे अधिवेशन बोलावण्यची गरज नाही याच अधिवेशनात कायदा करावा. अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मराठ्यांची नाराज अंगावर घेऊ नका. जर वेळेत निर्णय आला नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा जाहीर करावी लागेल.." असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil
Sharad Pawar Exclusive: संसदेच्या १४२ खासदारांचं निलंबन, शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले...

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर (Chhagan Bhujal News) निशाणा साधला. "त्यांची गरळ ओकण्याची सवय जुनीच आहे. ते राजकीय फायद्यासाठी गोरगरिबांचा वापर करतात, हे गरिबांच्या लक्षात आले आहे. मात्र ओबीसी बांधवांनी त्यांना ओळखले आहे. आता त्याचा फायदा होणार नाही.." असे जरांगे पाटील म्हणालेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Sharad Pawar Exclusive: संसदेच्या १४२ खासदारांचं निलंबन, शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com