Sharad Pawar Exclusive: संसदेच्या १४२ खासदारांचं निलंबन, शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले...

Sharad Pawar On Parliament MP Suspended: सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह अनेक सदस्यांनी कधीही नियमांच्या बाहेरचं वर्तण केलं नाही. खासदार आक्रमक झाल्याने त्यांना शिक्षा म्हणून निलंबित करण्यात आले.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
Published On

MP Suspended in Parliament Delhi:

लोकसभेतील खासदारांचं निलंबन सत्र आजही सुरूच आहे. आज लोकसभेमध्ये ४९ खासदारांना निलंबित करण्यात आलं. आतापर्यंत दोन्ही सभागृहातील एकूण १४२ खासदारांचं निलंबन झालं आहे. याआधी अशी कारवाई केव्हाच झाली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar
Bhandara Crime News : महिला वकिलावर जीवघेणा हल्ला; घटस्फोटाच्या खटल्यात बायकोची बाजू मांडल्याचा राग

"सभागृहात संसद सुरक्षा भंग मुद्द्यांवरून विरोधी पक्षातील खासदारांनी आक्रमक होत गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन निवेदन करावं अशी मागणी केली होती. परिस्थिती लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी मागणी मान्य करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता एवढ्या मोठ्या संख्येने सदस्यांना सदनाबाहेर काढण्यात आलं", असं म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) नाराजी व्यक्त केली.

"सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह अनेक सदस्यांनी कधीही नियमांच्या बाहेरचं वर्तण केलं नाही. खासदार आक्रमक झाल्याने त्यांना शिक्षा म्हणून निलंबित करण्यात आले असेल तर, मोदींच्या राज्यात संसदेला कोणत्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला याचं हे उत्तम उदाहरण आहे.", अशा शब्दांत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

इंडिया आघाडीच्या बैठकीत देखील या मुद्द्यावर चर्चा होईल. संसदेत झालेल्या घुसखोरीबाबत योग्य ती माहिती द्या. यामागे कुणाचा हात आहे? अशी माहिती विचारत असताना खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशा पद्धतीची घटना याआधी केव्हाच घडली नव्हती, असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
Telangana Crime: भयंकर हत्याकांड! एकाच घरातील ६ जणांना संपवलं, आठवडाभर हत्येची मालिका; वाचा थरारक घटनाक्रम...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com