जमिनीच्या वादातून एकाच घरातील सहा जणांची निर्घृण हत्या केल्याचा भयंकर प्रकार तेलंगणात घडला. एका आठवड्यापासून विविध भागात सापडलेले मृतदेह अन् त्याचा परस्पर संबंध पोलिसांना आढळून आला ज्यानंतर हा भयंकर घटनेचा उलघडा झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News in Marathi)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तेलंगणातील (Telangana) मकलूर येथे 20 वर्षीय तरुणाने जमीन हडपण्यासाठी एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील चार अनोळखी मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. ९ डिसेंबरपासून जवळपास एक आठवडाभर हे हत्याकांड सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना सापडलेल्या मृतदेहांमुळे या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.
मृतदेहांमुळे झाला उलगडा...
14 डिसेंबर रोजी कामारेड्डी जिल्ह्यातील सदाशिव नगर पोलीस स्टेशन परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेह पूर्णपणे जळाला होता. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन संशयितांना अटक केली. यानंतर मेडक जिल्ह्यात आणखी एका महिलेचा मृतदेह सापडला, हा मृतदेहही जळालेला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता दोन्ही मृत महिला हत्या झालेल्या सख्ख्या बहिणी असल्याचे निष्पन्न झाले.
संपत्ती हडपण्यासाठी केली हत्या....
त्यानंतर निजामाबाद जिल्ह्यातून एका पुलाखाली आणखी दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत.पोलीस तपासात लहान मुले आणि महिला या दोघांचाही संबंध असल्याचे निष्पन्न झाले. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली.
चौकशीदरम्यान मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की, दोन्ही मृत मुलांचे पालक बेपत्ता आहेत, त्यांचा कुठेही पत्ता नाही, कामारेड्डी जिल्ह्यातील त्यांच्या घरालाही कुलूप आहे. त्यांचाही खून झाला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या वडिलांनी त्यांची संपूर्ण मालमत्ता एकाच नावावर केली होती, जी आता परत करण्यास ते नकार देत होते, या प्रकरणावरून अनेक वाद झाले होते. याच संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडाने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.