Who Is Sapna Didi: भारत-पाक मॅचमध्येच दाऊदला मारण्याचा कट रचणारी लेडी डॉन! कोण होती सपना दीदी?

Dawood Ibrahim News: सध्या देशभरात चर्चा आहे ती सपना दीदीची. कोण आहे ही सपना दीदी, जिने अंडरवर्ल्डमधील कुख्यात डॉन दाऊदला संपवण्याचा कट आखला होता. तिच्याचबद्दल जाणून घेऊ...
Who Is Sapna Didi
Who Is Sapna DidiSaam Tv
Published On

Who Is Sapna Didi:

मुंबईतील नागपाडा इथल्या घराघरात एक महिला मॅच बघत घरात बसली होती. टीव्हीवर सुरु असलेली मॅच खेळली जात होती शारजाहमध्ये. पाकिस्तानने पहिल्यांदा बॅटिंग करत २६२ धावा केल्या होत्या. नंतर टार्गेट चेस करताना भारताच्या ४७ रन्सवरच ४ विकेट पडल्या होत्या. आकिब जावेदने पहिल्याच बॉलवर सचिनला LBW केलं होतं.

मॅच हातातून गेली, असं समजून अनेक भारतीयांनी टीव्ही बंद करायला सुरुवात केली होती. पण मुंबईत टीव्हीसमोर बसलेल्या एका महिलेला कोणताच फरक पडत नव्हता. कोण जिंकेल? कोण हरेल? याच्याशी तिला काहीही देणंघेणं नव्हतं. पण संपूर्ण मॅचमध्ये तिची नजर टीव्हीवरच होती. तिला फक्त टीव्हीवर दिसणाऱ्या शारजाहच्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीशी देणंघेणं होतं.

शारजाहच्या याच ग्राऊंडमध्ये व्हिआयपी सीटवर अशी एक व्यक्ती बसली होती, ज्याच्याशी बदला घेण्याच्या इराद्याने ही महिला मॅच टक लावून पाहत होती. हा बदला क्रिकेटच्या मैदानात आणि सगळ्या दुनियेसमोर घ्यायचा तिचा प्लान होता. हा प्लान जिने आखला होता, त्या महिलेचं नाव होतं सपना दीदी. मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील एक कुख्यात लेडी डॉन ही सपना दीदी दाऊदशी बदला घेण्यासाठी दुबईलाही जाण्यासाठी तयार झाली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Who Is Sapna Didi
Arvind Kejriwal ED Notice: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED ने पाठवलं समन्स, 21 डिसेंबरला हजर राहण्याचे निर्देश

अशरफ ते सपना दीदी..!

सपना दीदीचं खरं नाव अशरफ. अशरफ एक दिवस आपल्या घरात निवांत आराम करत होती. इतक्यात शेजारहून निरोप आला की तुम्हाला दुबईवरुन फोन आलाय. हे शब्द कानावर पडताच अशरफचे डोळे चमकले. तिचं गळून गेलेलं शरीर एखादी जादू व्हावी, तसं एकाकी उत्साहीत झालं. ती टेलिफोनच्या रिसीव्हर जवळ पोहोचली आणि बोलू लागली. समोरुन आवाज आला, 'संध्याकाळी मी पोहोतोय. एअरपोर्टवर भेटू.' (Latest Marathi News)

अशरफ लगेचच तयार झाली आणि त्या व्यक्तीची वाट पाहू लागली. फ्लाईट दुपारी ४ वाजता लॅन्ड होणार होती.. पण एक तास आधीच अशरफने टॅक्सी बोलावली आणि ती थेट एअरपोर्टच्या दिशेने निघाली.

लग्न, प्रेम आणि एन्काऊंटर

अशरफचं पूर्ण नाव होतं अशरफ खान. तिचा नवरा महमूद दुबईतून कित्येक दिवसांनंतर पुन्हा परतणार होता. पाच वर्षांपूर्वी दोघांची भेट एका लग्नात झाली होती. पहिल्याच नजरेत दोघ एकमेकांच्या प्रेमात पडली. नंतर लग्न झालं आणि संसार सुखासुखी सुरु होता. चांगलं घर, कपडे, खाणं-पिणं, फिरणं.. कुणाची नजर लागू नये, असा संसार अशरफ आणि महमूदचा सुरु होता.

अशरफ कमवायचाही खूप आणि खर्चही तितकाच करायचा. अशरफला आपला नवरा दुबईत असतो आणि बिझनेस करतो, एवढंच माहीत होतं. पण तो कुणासोबत असतो आणि काय करतो, याची तिला कल्पना नव्हती. एअरपोर्टवर जाताना हा सगळा सिलसिला अशरफच्या डोळ्यासमोरुन फ्लॅशबॅकसारखा भर्रकन मागे सरकला होता. पण एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर अशरफला कळणार होतं, की महमूद नेमकं काम काय करतो, कुणासोबत बिझनेस करतो आणि त्यामुळे तिचं आयुष्यच कसं बदलून जाणार आहे!

एअरपोर्टमधून लोकं बाहेर येऊ लागले. अशरफही बाहेरच महमूदची वाट पाहत होती. इतक्यात काही पोलिसांच्या गाड्या तिच्या मागे येऊन उभ्या राहिल्या. पोलिसांकडे अशरफ फारसं लक्ष दिलं नाही. काही वेळाने तिला महमूदचा चेहरा दिसला. महमूद अशरफच्या दिशेने येतच होता, इतक्यात त्याला तिच्यामागे असलेले पोलिस दसले. डोळ्यांची पापणी लवण्याआतच अशरफसमोरुन महमूद गर्दीत गायब झाला. तो नेमका गेला कुठे? अशरफचे डोळे चिंतातूर झाले होते. इतक्यात तिला गर्दीतूनच गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. काही क्षणात एक अब्म्युलन्स आवाज करत अशरफच्याच बाजूने निघून गेली आणि गर्दीही एकाएकी निवळली.

Who Is Sapna Didi
Mamata Banerjee: केजरीवाल यांच्यानंतर ममता बॅनर्जी यांचाही काँग्रेसला धक्का? इंडिया आघाडीत नेमकं चाललंय काय?

अशरफच्या मनातील शंका आता विश्वासात बदलत गेली. तिने एम्ब्युलन्स गेली कुठे याचा शोध घेतला. एम्ब्युलन्स कूपरच्या दिशेने निघाल्याचं कळलं. पण तिथे गेल्यानंतरही अशरफला महमूदचा काहीच ठावठिकाणा लागेना.

अशरफ थेट अंधेरी पोलिस ठाण्यात गेली. तिथून एका पोलिस ठाण्यातून दुसऱ्या पोलिस ठाण्यात.. हे करता करता.. संध्याकाळचा अंधार आणखी गडद होत गेला. पण महमूद कुठंय, काही कळायला मार्ग नव्हता. अखेर एका पोलिस वाल्यानं तिला जेजे रुग्णालयात जायला सांगितलं. अशरफ तिथे गेली. तिथेच एका कोपऱ्यात महमूदचा मृतदेह एका बेडवर कोपऱ्यात पडून होता. पोलिसांच्या गोळ्यांनी तिच्या शरीराला आरपार भेदलं होतं. अशरफला काही कळायच्या आतच महमूदचे कुटुंबीय आले आणि त्याला कब्रिस्तानात घेऊन गेले.

लल्लनटॉपने दिलेल्या वृत्तानुसार, दुसऱ्याच दिवसी पोलिसांनी पत्रकार परिषदेतून महमूदचा एन्काऊंटर झाल्याचं सांगितलं आणि अशरफचे डोळे खाडकन उघडले. महमूदचं खरं नाव महमूद खान होतं. पण बिझनेसमध्ये मदमूदला मदमूद कालिया म्हणूनच ओळखलं जात होतं. महमूद अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करायचा. दाऊदच्या कोणत्यातरी एका विषयावरुन खटके उडाल्यानंतर दाऊदच्या माणसांनी पोलिसांना महमूद कालियाची टीप पोलिसांना दिली. त्यानंतर महमूदचा खात्मा पोलिसांनी केलाय, ही गोष्ट अशरफला लक्षात आली. आता आपल्याला दाऊदशी बदला घ्यायचाय, हे अशरफने मनोमन ठरवून टाकलं खरं, तर ती अंडरवर्ल्ड आणि तिथे चाललेल्या सगळ्याच गोष्टींशी अनभिज्ञ होती.

सपनाची अंडरवर्ल्डमध्ये ओळख झाली ती हुसेन उत्सराशी. हुसेन उत्सरा ही एक अशी खतरनाक व्यक्ती, ज्याने लहान असतानाच एका मुलाला असा गळा चिरला होता.. की डॉक्टरही महाले होते.. की असं वाटतंय की कोणत्या तरी सर्जिकल स्टाईलने कापलंय. तेव्हापासून मुहम्मद हुसैन याचं नाव हुसैन उत्सरा असं पडलं होतं.

अशरफला कुणीतरी सांगितलं की हुसैन उत्सराचं दाऊदशी पटत नाही. त्यामुळे ती हुसैनला भेटायला गेली. सुरुवातीला तर अशरफचं म्हणणं ऐकून हुसैन हजला, पण नंतर अशरफचे पक्के इरादे पाहून तो तिला मदत करायला तयार झाला. त्याने अशरफला मार्शल आर्ट्स आणि हत्यारं चालवण्याचं ट्रेनिंग दिलं. दोघांमध्ये दोस्ती वाढली. नंतर हुसैनच्या मदतीने अशरफने दाऊदच्या ठिकाणांवर पाळत ठेवायला सुरुवात केली.

मुंबईत दाऊदशी थेट पंगा घेण्यापेक्षा दाऊदच्या मुंबईतील बिझनेसला फटका बसा बसेल, या इराद्याने दोघांनी प्लान आखला. थोड्याच दिवसात अशरफ पोलिसांचीही खबरी बनली होती. तिने दाऊदच्या अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात मोठी मदत केली होती. पण दाऊदचं अटेन्शन हवं असेल, तर मोठा धमाका करायलाच हवा, याचीही जाणीव तिला झाली. यातून जन्म झाला सपना दीदीचा..!

अशरफ हीच पुढे जाऊन सपना दीदी बनली. पण तिने सपना नावच का पक्क केलं याच्यामागे अरुण गवळी कनेक्शन सांगितलं जातं. दाऊदच्या अनेक शत्रूंपैकी एक होता अरुण गवळी. हे ध्यानात घेऊनच अशरफ अरुण गवळीला भेटायला गेली. पण अरुण गवळी यांनी मदत करण्यास विरोध केला. माझा 'त्याच्या'सारख्या लोकांवर विश्वास नाही, असं अरुण गवळी यांनी सांगितल्यानंतर अशरफने आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. बुरखा घालणं तिनं सोडून दिलं. ती जीन्स टॉप घालू लागली. बाईक चालवू लागली. इतकंच काय.. तर तिने आपली एक गॅन्गही तयाप केली. तिच्या गॅन्गमधली पोरं ही दाऊदवर खार खाऊन होती. आपल्या गॅन्गमधील पोरांच्या जोरावर सपना पुढे जाऊन.. लेडी डॉन सपना दीदी बनली. सपना बनूनच तिने दाऊदला टार्गेट करायचं ठरवलं.

१९९०च्या आसपास सपनाला दाऊदपर्यंत पोहोचण्याचा रस्ता काय आहे, हे कळलं. हा रस्ता क्रिकेटच्या मैदानातून जातो, याची जाणीव तिला झाली. दुबईत होत असलेल्या भारत आणि पाकिस्तान मॅचमध्ये नेहमीच एक व्हीआयपी सीट बुक असायची. ही सीट होती, दाऊद इब्राहिम याची. आपल्या गॅन्गमधील लोकांच्या मदतीने दाऊद क्रिकेटच्या सट्टेबाजीचंही रॅकेज चालवत होती. मुंबई पोलिसही दाऊदच्या मागावर होती. पण दुबई आणि शारहाजमध्ये दाऊद आरामात मॅच पाहू शकत होता. ही गोष्ट कळल्यानंतर सपनाने दाऊदला मारण्यासाठी आणि बदल घेण्यासाठी एख प्लान आखला.

सपनाने आपल्या गॅन्गमधील पोरांना दुबईला पाठवलं. ते दाऊदचे व्हिडीओ बनवायचे आणि सपना पर्यंत पोहोचवायचे. नंतर सपनाने क्रिकेट मॅचचा नकाशाही बनवला. स्टेडिअमची रेकी केली. स्टेडिअमध्ये दाऊद हत्यार घेऊन येऊ शकत नव्हता. हेच ध्यानात घेऊन सपनाने मास्टरप्लान आखला होता.

स्टेडिअममध्ये दाऊदला टार्गेट करायचं. सपनाच्या गॅन्गमधील मुलं चाकू किंवा धारदार हत्यारं लपवून स्टेडिअममध्ये नेतील, दाऊदपर्यंत पोहोचली आणि त्याचा काटा काढतील, असा हा प्लान होता. एकीकडे स्टेडिअमध्ये जेव्हा टाळ्यांचा कडकडाट सुरु असेल, तेव्हा दाऊदचा करेक्ट कार्यक्रम करायचा, असा सपनाचा इरादा होता. प्लान रेडी झाला. आता सपनाला फक्त योग्य वेळ केव्हा येते, याची प्रतीक्षा होती. संधी केव्हा मिळते, याचीच ती वाट पाहत होती.

सपनाने पुढे जाऊन नागपाडातील हुजरा मोहल्ल्यात घर घेतलं. तिथंच तिनं दाऊदच्या हत्येचा कटही रचला. पण हुजरा मोहल्ला हा मुसाफिर खानाच्या बरोबर बाजुलाच होता. इथंच एकेकाळी दाऊदचं घरही होतं. सपना शत्रूच्या इलाक्यात राहूनच त्याला आव्हान देऊ पाहत होती. पण हीच गोष्ट तिच्या इराद्याच्या आड आली.

सपनाच्या प्लॅनची खबर कुणीतरी छोटा शकीलपर्यंत पोहोचवली. छोटा शकील तेव्हा दाऊदचा डावा हात असल्यासारखाच होता. छोटा शकीलच्या गॅन्गमधील मुलंच मुंबईवर सगळी नजर ठेवायची. छोटा शकीलच्या गॅन्गला सपनाच्या सगळ्या हरकती माहीत होत्या. ते तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होते.

एक दिवस सपना आपल्या घरात आराम करत होती. शकीलच्या गॅन्गमधील काही मुलं रात्री आली आणि त्यांनी सपनाला घरातून नेलं. तिच्याच घराच्या खाली शकीलच्या माणसांनी सपनावर सपासप वार करत तिच्या हत्या केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com