Mamata Banerjee: केजरीवाल यांच्यानंतर ममता बॅनर्जी यांचाही काँग्रेसला धक्का? इंडिया आघाडीत नेमकं चाललंय काय?

INDIA Alliance News: लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन झालेल्या इंडिया आघाडीचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी या जागावाटपावरून काँग्रेसचं टेन्शन वाढू शकतात.
India Alliance Latest News
India Alliance Latest NewsSaamtv
Published On

INDIA Alliance News:

लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन झालेल्या इंडिया आघाडीचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसत आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील सर्व 13 जागांवर लढण्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेस काँग्रेससाठी फक्त दोन जागा सोडण्यास तयार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक 19 तारखेला होणार आहे.

यात ममता बॅनर्जी जागावाटपावरवर अंतिम तोडगा काढण्याचा आग्रह करू शकतात, असं बोललं जात आहे. याबाबत तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, यावेळी त्या प्रस्ताव देऊ शकतात की आम्ही काँग्रेससाठी मालदा आणि बर्हमपूर जागा सोडण्यास तयार आहोत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

India Alliance Latest News
Maharashtra Political News : सेंटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर झोंबणारी टीका

असं असलं तरी ममता बॅनर्जी यांनी सध्या याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. दिल्लीला जाण्यापूर्वी त्या म्हणाल्या, 'सीट शेअरिंगवर मी आत्ताच काही बोलू शकत नाही. 19 डिसेंबरच्या बैठकीनंतरच कळेल.' टीएमसीने ज्या दोन जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यापैकी एक अधीर रंजन चौधरी यांची बेरहामपूर जागा आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील या जागेवर राज्यातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या 66 टक्के आहे. अधीर रंजन चौधरी 1999 पासून सातत्याने येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत.  (Latest Marathi News)

याशिवाय शेजारील मालदा जिल्ह्यातील दक्षिण मालदा ही जागाही काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथील काँग्रेसचे अबू हसिम खान चौधरी हे खासदार आहेत. 2009 पासून ते सातत्याने प्रतिनिधित्व करत आहेत. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला या दोनच जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत तुम्ही इथे जिंकलात, म्हणून आम्ही सोडत आहोत, असे सांगून टीएमसी त्यांना या दोन जागा देऊ शकते. इतर जागांवर आम्ही जोरदार लढू आणि तुम्ही आम्हाला साथ द्या, असं टीएमसीकडून सांगितलं जाऊ शकतं, असं सूत्रांचं म्हणणं आहे. ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच तसे संकेत दिले असून प्रत्येक राज्यात भाजप उमेदवाराच्या तुलनेत समान उमेदवार देण्याच्या रणनीतीवर काम करावे लागेल, असे सांगितले.

India Alliance Latest News
Vijay Wadettiwar News: ललित पाटील प्रकरणावरुन विरोधक आक्रमक, 'हे महाराष्ट्र सरकार पुरस्कृत रॅकेट...' वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

याशिवाय काँग्रेसला प्रादेशिक पक्षांना महत्त्व द्यावे लागेल, असे त्या म्हणाल्या होत्या. ज्या राज्यात प्रादेशिक पक्ष बलाढ्य आहे, तेथे त्याला प्रमुख जागा द्याव्या लागतील. अशातच केवळ दोन जागा स्वीकारणे आणि आपला पाया मजबूत करू पाहणाऱ्या काँग्रेससाठी हे सोपे जाणार नाही. टीएमसीच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाच्या बैठकीत असे दिसून येते की ममता बॅनर्जी थेट सोनिया आणि राहुल यांना दोन जागा घेण्यास सांगतील. याशिवाय मार्च-एप्रिलमध्ये राज्यसभेसाठी त्या अभिषेक मनू सिंघवी यांना पाठिंबा देऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com