Arvind Kejriwal ED Notice: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ED ने पाठवलं समन्स, 21 डिसेंबरला हजर राहण्याचे निर्देश

Delhi Liquor Policy: दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ आहे.
Arvind Kejriwal ED Notice
Arvind Kejriwal ED Noticesaam tv
Published On

Arvind Kejriwal ED Notice:

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ आहे. ईडीने त्यांना 21 डिसेंबर रोजी समन्समध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी ईडीने दारू घोटाळ्याप्रकरणी समन्स जारी केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने ते जाऊ शकले नाही.

ईडीने केजरीवाल यांना समन्स का पाठवले?

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने आरोपपत्रात अनेकवेळा अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ईडीने म्हटले आहे की, दिल्ली धरू धोरण धोरण 2021-22 हे आम आदमी पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी सतत बेकायदेशीरपणे पैसे कमवण्यासाठी बनवले होते. बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कारवायांना चालना देण्यासाठी हे धोरण जाणूनबुजून तयार करण्यात आले, असा दावा ईडीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरी झालेल्या बैठकीपासून ते आरोपींसोबत व्हिडिओ कॉलपर्यंतच्या घटनांचा उल्लेख ईडीने आपल्या आरोपपत्रात केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Arvind Kejriwal ED Notice
Mamata Banerjee: केजरीवाल यांच्यानंतर ममता बॅनर्जी यांचाही काँग्रेसला धक्का? इंडिया आघाडीत नेमकं चाललंय काय?

ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करण्यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीला उत्तर पत्र लिहिले होते. या पत्रात केजरीवाल यांनी समन्स बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या सांगण्यावरून हे समन्स पाठवण्यात आले आहे. मी चार राज्यांतील निवडणूक प्रचारासाठी जाऊ नये, यासाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे, असेही केजरीवाल म्हणाले होते. ईडीने तात्काळ समन्स मागे घ्यावं असं ते म्हणाले होते. (Latest Marathi News)

Arvind Kejriwal ED Notice
Maharashtra Political News : सेंटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर झोंबणारी टीका

आप पक्षाला संपवण्याचा प्रयत्न : सौरभ भारद्वाज

दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, आम आदमी पार्टीला संपवण्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे. केंद्र सरकार अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही मार्गाने खोटे केस उभे करून अटक करण्याच्या तयारीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com