Corona In Mumbai
Corona In MumbaiSaam TV

Corona In Mumbai: काळजी घ्या! मुंबईला पुन्हा कोरोनाचा विळखा? रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय

Corona Patients Increases In Mumbai: २२ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ८ व्यक्ती कोरोना (Corona) पॉझिटीव्ह आढळल्या. ११ डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्या १२ वर पोहचली. तर आतापर्यंत रुग्णांचा आकडा २४ वर पोहचला आहे.
Published on

Covid News:

कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. महत्वाचे म्हणजे मुंबईमध्ये देखील कोरोना बाधित रुग्ण आढळे आहेत. महाराष्ट्रात आज कोरोनाचे नविन १३ रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण मुंबईमधीलच आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Corona In Mumbai
Pune Covid Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळा, माजी आरोग्य प्रमुखांवर 90,00000 च्या घोटाळ्याचा आरोप

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या २४ आहे. कोरोना संक्रमित सर्वच रुग्णांना होम कॉरंटाइन करण्यात आलं आहे. कोणत्याही रुग्णवर रुग्णालयात उपचार सुरू नाहीत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी कोरोना संक्रमित रुग्ण आढळू लागले. २२ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ८ व्यक्ती कोरोना (Corona) पॉझिटीव्ह आढळल्या. ११ डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्या १२ वर पोहचली. तर आतापर्यंत रुग्णांचा आकडा २४ वर पोहचला आहे.

कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता केंद्र सरकारने व्यवस्थापनविषयक महत्त्वाची धोरणे अधोरेखित केली आहेत.

  • आगामी सण उत्सवांचा काळ लक्षात घेता, राज्यांनी पुरेशा सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक व्यवस्था सज्ज ठेवाव्यात.

  • रुग्णसंख्येचा वाढता कल लवकर ओळखण्यासाठी, फ्लू सारखे आजार किंवा गंभीर स्वरूपाच्या श्वसन रोगावर लक्ष ठेवण्यासाठी याबाबत वेळोवेळी अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी तसेच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या रक्ताचे नमुने, भारतीय सार्स सीओव्ही-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (आयएनएसएसीओजी) प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.

  • देशात नवीन स्वरूपाचा विषाणू आल्यास, त्याचा वेळेवर शोध घेता येईल.

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, सर्व सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांची तयारी आणि प्रतिसाद क्षमता यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या रंगीत तालमीत त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे.

Corona In Mumbai
Morning Super Food: सकाळी नियमितपणे खा मोड आलेले हिरवे मूग, मिळतील आश्चर्यकारक फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com