Manasvi Choudhary
डाळीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात जे शरीरासाठी फायदेशीर आहे.
शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य खाण्याचा सल्ला दिला जातो.
मोड आलेल्या हिरव्या मूगांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि आहारातील फायबर, तसेच व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट्स हे पोषकघटक असतात.
नियमितपणे मोड आलेले हिरवे मूग खाल्ल्याने वजन कमी करण्यात मदत होते
मोड आलेले मूग उकडून खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत होते बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
मोड आलेले हिरवे मूग खाल्ल्यास शरीरातील रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि लाल पेशी वाढतात.
मोड आलेले हिरवे मूग खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो व हृदयाच्या समस्या कमी होतात.