Pune Covid Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळा, माजी आरोग्य प्रमुखांवर 90,00000 च्या घोटाळ्याचा आरोप

Pune News : पुणे महापालिकेत कोविड घोटाळा, माजी आरोग्य प्रमुखांवर 90,00000 च्या घोटाळ्याचा आरोप
Pune Covid Scam
Pune Covid ScamSaam Tv
Published On

>> सचिन जाधव

Pune Covid Scam :

मुंबई महानगरपालिकेनंतर आता पुणे महापालिकेतही कोविड घोटाळा झाल्याची बातमी समोर येत आहे. पुणे महापालिकेचे माजी आरोग्य प्रमुख डॅाक्टर आशिष भारती यांच्यावर कोविड काळात घोटाळा केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी महापालिकेचे माजी आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण सूर्यकांत तरडे, डॉ. सूर्यकांत हनुमंत गाडिया यांच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोप 2021 मध्ये कोविड-19 कालावधीत 80 ते 90 लाख रुपयांच्या घोटाळ्यात त्यांच्या कथित सहभागाशी संबंधित आहेत. या घोटाळ्याचा केंद्रबिंदू वारजे येथील अरविंद बारटक्के क्लिनिक होता, असं सांगितलं जात आहे. हा घोटाळा नुकताच उघडकीस आता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Covid Scam
Mumbai Metro-12 : कल्याण-डोंबिवलीतून मुंबई, नवी मुंबई काही मिनिटांतच गाठता येणार! मेट्रो १२ ची निविदा येत्या २ दिवसांत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष भारती पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख होते, त्या कालावधीत शहरात अनेक ठिकाणी लागणाऱ्या कोविड टेस्ट शासनाकडून आलेल्या सर्व आरोग्याच्या वस्तू खोट्या नोंदी करून या खासगी रुग्णालयात विकल्या जात होत्या. (Latest Marathi News)

आशिष भारती यांनी नागरिकांसाठी आलेले सरकारी औषधे पीपीई किट कोरोना टेस्टिंगचे साहित्य हे नागरिकांना न देता कागदोपत्री नागरिकांना दिल्याचे दाखवत खासगी रुग्णालयात विकत होते, असा आरोप आहे.

Pune Covid Scam
Raju Shetti: राजू शेट्टींचा सदाभाऊंच्या टिकेवर पलटवार, सांगलीतील साखर कारखानादारांना दिला इशारा

या घोटाळा प्रकरणी डा. आशिष भारतीय ,डॉ.अरुणा सूर्यकांत तारडे डा. ऋषिकेश हनुमंत गार्डी या तीन या तिघाजणासह इतरांवर वारजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून ही यात मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com