Sanjay Raut: 'मराठा ओबीसी नेत्यांनी टोकाची टीका करु नये..' राऊतांचा छगन भुजबळ- जरांगे पाटलांना सल्ला; भाजपवर टीकास्त्र

India Alliance Meeting: २०२४ च्या दृष्टीने ही बैठक महत्वाची आहे. बैठकीमध्ये फक्त फक्त चर्चा नाही तर अनेक निर्णय घेतले जातील आणि लोकशाहीचं रक्षण करणे हा बैठकीच प्रमुख अजेंडा असल्याचे," राऊत यावेळी म्हणाले.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSaam TV
Published On

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. १८ डिसेंबर २०२३

Sanjay Raut News:

इंडिया आघाडीची नियोजित बैठक उद्या (मंगळवार, १९ डिसेंबर) दिल्लीमध्ये पार पडणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आज दिल्लीला जाणार आहेत. त्याआधी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांचीही दिल्लीमध्ये भेट होणार आहे. याच पाश्वभूमीवर आगामी निवडणूकांसाठी उद्याची बैठक निर्णायक ठरेल.. असे मोठे विधान खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत ३ वाजता होत आहे. बैठकीसाठी सगळ्या घटकपक्षांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निमंत्रण दिलं आहे. या बैठकीआधी उद्धव ठाकरे केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. २०२४ च्या दृष्टीने ही बैठक महत्वाची आहे. बैठकीमध्ये फक्त फक्त चर्चा नाही तर अनेक निर्णय घेतले जातील आणि लोकशाहीचं रक्षण करणे हा बैठकीच प्रमुख अजेंडा असल्याचे," राऊत यावेळी म्हणाले.

जरांगे- भुजबळांना सल्ला...

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी - मराठा संघर्षावरही महत्वाचे विधान केले. "राजकीय नेत्यांनी जाती- पातीचे राजकारण करु नये. अशी भाषा सर्वांनीच टाळली पाहिजे. भुजबळ (Chhagan Bhujbal) हे मोठ्या समाजाचे नेते आहेत. मनोज जरांगे (Manoj jarange) देखील मोठ्या समाजाच नेतृत्व करत आहेत. राज्याचे वातावरण खराब होणार नाही. याची काळजी घ्यावी.." असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sanjay Raut News
Ahmednagar News: ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं, धावत्या कारवर आयशर टेम्पो कोसळला; क्षणार्धात अख्खं कुटुंबच संपलं

फडणवीसांवर निशाणा...

"राज्याचा कारभार सध्या दिल्लीतून सुरू आहे. कोणावर काय कारवाई करायची हे दिल्लीतून ठरते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत कायमचे येऊन राहिले तरी काही फरक पडणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना दोन ज्युनिअरच्या हाताखाली काम करावं लागतंय." असे म्हणत फडणवीस यांना विपशयानेची गरज असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. (Latest Marathi News)

Sanjay Raut News
Nagpur Latest News : 'घटनेची चौकशी तीन स्तरांवर होणार', नागपूर स्फोट दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com