Bhujbal In OBC Mahamelava: ओबीसींनी एकत्र येऊन ताकद दाखवली पाहिजे; भिवंडीच्या सभेत भुजबळ कडाडले

OBC Mahamelava: ओबीसी निर्धार महामेळाव्यात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी परत एकदा मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला. हल्लाबोल करतानाच त्यांनी आपला मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचं म्हटलं. परंतु मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसी समाजाच्याविरोधात बोलणाऱ्यांना आपली ताकद दाखवून द्या, असं आवाहनसुद्धा त्यांनी समाजाच्या जनतेला केलं.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Saam Tv
Published On

Chhagan Bhujbal In Bhiwandi OBC Mahamelava:

ओबीसी समाजाने एकत्र येत आपली ताकद दाखवली पाहिजे. माझी वाट पाहून नका, ठीक-ठिकाणी सभा घ्या, आंदोलन, उपोषण करा. ओबीसींना जागं करा, जागृत करा. ओबीसींच्याविरोधात बोलणाऱ्यांना आपली ताकद दाखवून द्या, असा हुंकार छगन भुजबळ यांनी भिंवडीच्या सभेत भरला. (Latest News)

मंत्री छगन भुजबळ हे भिवंडीत ओबीसी निर्धार महामेळाव्यात बोलत होते. भिवंडीत ओबीसी समाजाच्यावतीने मुंबई नाशिक महामार्गजवळ सोनाळे भागात निर्धार महामेळावाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी परत एकदा मनोज जरांगे-पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आपण मराठा आरक्षणाच्याविरोधात नाहीत, परंतु वाटेकरी करण्यास आपला विरोध असल्याचं भुजबळ म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाला ओबीसी घेऊन इतर जातींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपदेखील भुजबळ यांनी केला. मोदी सरकारने जे आर्थिक मागासांना १० टक्के आरक्षण दिलं. त्यातील ८५ टक्के जागांचा लाभ मराठ्यांनी घेतला. सारथीला मोठ्या प्रमाणात मदत केली जातेये, पण ओबीसींना मदत केली जात नाही. हा भेदभाव मंजूर नाही. धनगर समाजाला योजनेची मदत जाहीर करून अद्याप मदत मिळालेली नाही. त्यांना जे देताय ते आम्हालाही द्या हीच आमची मागणी, असल्याचं ते म्हणाले.

यावेळी भुजबळांनी मराठा समाजातील लोकांनी किती प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या आहेत. याची त्यांनी संपूर्ण आकडेवारी मांडली. लोकसेवा आयोगात ए ग्रेड मध्ये ३३ टक्के मराठा आहे, बी ग्रेड सेवांमध्ये १९ टक्के, सी ग्रेडमध्ये ३८ टक्के आणि डी ग्रेडमध्ये ३६ टक्के मराठा समूदायाचे लोक आहेत. मंत्रालयातसुद्धा ५४ टक्के मराठा समाज आहे. तर १६ टक्के आयएएस मराठा आणि २८ टक्के आयपीएस मराठा समाजातील लोकं आहेत, अशी आकडेवारी छगन भुजबळांनी सादर केली.

Chhagan Bhujbal
Maharashtra Politics: 'तुम्ही जामिनावर आहात, आक्रमक व्हा...', भास्कर जाधवांचा भुजबळांबाबद खळबळजनक दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com